तुमचा मुलगाही नेहमी पोटदुखीची तक्रार करतोय? असू शकते 'ही' समस्या, वाचा कारण अन् उपाय

टीम ई सकाळ
Thursday, 8 April 2021

बद्धकोष्ठता लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना असते. मुलांना भूख लागत नसले, जेवायला दिलेलं खात नसेल तसेच निराश दिसत असेल तर ते नक्कीच बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहे. त्यावर काही घरगुती उपाय आहे, त्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नागपूर : लहान मुलं  नेहमी पोट दुखण्याची तक्रार करत असेल किंवा त्यांना भूख लागत नसेल तर त्यांना बद्धकोष्ठतेची समस्या असू शकते. कारण बद्धकोष्ठता झाल्यानंतर हे सर्व लक्षणे दिसतात. तुम्ही विचार करत असाल की या सर्व समस्या फक्त मोठ्या व्यक्तींना होतात. तर तुम्ही चुकीचे आहात, बद्धकोष्ठता लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना असते. मुलांना भूख लागत नसले, जेवायला दिलेलं खात नसेल तसेच निराश दिसत असेल तर ते नक्कीच बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहे. त्यावर काही घरगुती उपाय आहे, त्याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा - नागपुरातही होती लस संशोधन संस्था; झाली होती देवी, कॉलरा लशींची निर्मिती; केंद्र...

लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचे कारण -
लहान मुले हे आईचे दूध पितात. तरीही त्यांना ही समस्या जाणवते. कारण अनेक घरी बनवलेले किंवा बाहेरचे जेवण त्यांना खाऊ घालत असतो. त्याचे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे ही समस्या जाणवते.

 • मुलांना कोरडे अन्न खाऊ घालणे
 • दिनचर्येत बदल होणे 
 • जास्त डेअरी प्रोडक्ट खाऊ घालणे
 • जेवल्यानंतर लगेच झोपणे 
 • वेळेवर जेवण न देणे
 • कुठला मुलाला औषधोपचार सुरू असेल तर बद्धकोष्टतेची समस्या होऊ शकते.

लहान मुलांमध्ये बद्धकोष्टतेचे लक्षण -

 • दररोज शौचास न जाणे
 • शौच करताना त्रास होणे
 • पोटात अॅसिडिटी आणि दुखणे
 • पोटात भारी वाटणे आणि भूख कमी लागणे
 • शौच करण्यास जास्त वेळ लागणे
 • कधी कधी पाय आणि डोक्यात दुखणे

हेही वाचा - 'यशवंत स्टेडियमचा चेहरा मोहरा बदलणार; म्युझियम,...

घरगुती उपाय -

पातळ पदार्थ खायला द्या -
लहान मुलांना कोरडे पदार्थ खायला दिल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. लहान मुलांचे पचनशक्ती कमजोर असते. त्यामुळे ते सर्व प्रकारचे पदार्थ पचवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नेहमी पातळ पदार्थ खायला देणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे पचन चांगले होईल. तसेच आतडे लवकर स्वच्छ होतील असे पदार्थ खाऊ घाला. त्यामुळे त्यांचे पोट साफ होईल.

केळी आणि गरम पाणी -
बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी असेल तर केळी हे एक उत्तम फळ मानले जाते. तसेच लहान मुलांना सकाळी सकाळी गरम पाण्यासोबत केळी खाऊ घातेल तर पोट स्वच्छ होईल. त्यामुळे त्यांना बद्धकोष्टतेच्या समस्येपासून आराम मिळेल. 

फायबर असणारे पदार्थ -
लहान मुलं असो किंवा मोठे त्यांनी फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करायला पाहिजे. फायबर हे आतड्यांच्या स्वच्छतेसाठी गरजेचे आहे. त्यासाठी फळ आणि पालेभाज्या खाणे गरजेचे आहे. तसेच डाळीमध्ये फायबर असते. तसेच सफरचंद, नाशपती आणि केळी या फळांमध्ये देखील फायबर मोठ्या प्रमाणात असते.

मध लाभदायक -
बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी मध हे लाभदायक आहे. यामध्ये असे अनेक गुण असतात जे पोट स्वच्छ करण्यास मदत करतात. त्यासाठी लहान मुलांना कोमट पाण्यासोबत दोन चमचे मध द्या. त्यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही.  

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cause and remedies for constipation in child nagpur health news