गर्भधारणेत अडचणी येत आहेत? 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

जाणून घ्या,वंध्यत्व म्हणजे काय व कारणे?
Pregnent-women
Pregnent-women

बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारपद्धतीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. यामध्येच गेल्या काही काळात अनेक स्त्रियांना गर्भधारणेच्या वेळा समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातूनच मग पुढे स्त्रियांना वंध्यत्वासारख्या समस्यांना समोरं जावं लागतं. त्यामुळेच गर्भधारणेचा विचार करत असताना प्रत्येक जोडप्याने काही मुलभूत गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्येच जीवनशैलीचा व आहारपद्धतीचा परिणाम गर्भधारणेवर होऊ नये यासाठी काय करता येईल ते पाहुयात.(Common-pregnancy-problems-and-solutions-ssj93)

वंध्यत्व म्हणजे काय व कारणे?

गर्भवती होण्याचा प्रयत्न केल्यापासून एका वर्षाच्या आत गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागणे, गर्भधारणा न राहणे. वय, हार्मोनल असंतुलन, ट्यूबल ब्लॉकेज, गर्भाशयाचे फायब्रॉईड्स, एंडोमेट्रिओसिस, पीसीओएस किंवा ओव्हुलेशन, मासिक पाळी अनियमितता यासारख्या कारणामुळे वंध्यत्व येते. मात्र, निरोगी जीवनशैलीचा स्वीकार केला तर ही समस्या नक्कीच दूर होऊ शकते.

'या' गोष्टींची घ्या काळजी

१. तणावाचे व्यवस्थापन करा –

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तसेच अभ्यासानुसार तणावामुळे गर्भधारणेवर विपरित परिणाम होऊ शकतो. त्याकरिता तणावाचे व्यवस्थापन करणे अधिक गरजेचे आहे. अनेक स्त्रिया त्यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात येणा-या तणावावर मात करण्यासाठी धूम्रपान, मद्यपान किंवा उत्तेजन पेयाचे सेवन आणि अतिरेक करतात. याचा थेट परिणाम महिलेच्या आरोग्यावर, त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तीवर होतो. इतकंच नाही तर या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही होतो. त्यामुळे धुम्रपान, मद्यपान, ताण यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. तसंच तणावाचं व्यवस्थापन करता येत नसेल तर समुपदेशनाची निवड करा. सोबतच स्वत:शी चर्चा करण्याची सवय लावू शकता. मनन करणे, प्रियजनांबरोबर वेळ घालवणे, पुरेशी झोप व विश्रांती घेणे ताणतणावावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे.

२. वजन नियंत्रणात ठेवणे -

एखाद्या स्त्रिच्या गर्भधारणेत अडचण येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिचं वाढलेले वजन आहे. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार जास्त वजन असणे किंवा वजन कमी असणे या दोन्हींचा परिणाम प्रेग्नंसीवर होऊ शकतो. कमी वजनाच्या आणि जास्त वजनाच्या स्त्रियांना हार्मोनल असंतुलन आणि ओव्हुलेशन सारख्या अडचणी येऊ शकतात. त्यांना गरोदरपणात गुंतागुंत होण्याचा धोका देखील उद्भवू शकतो. म्हणूनच, आपण योग्य वजन राखणे गरजेचे आहे.

३.सक्रिय रहा -

दिवसभ आपलं शेड्युल कितीही बिझी असलं तरीदेखील स्वत:साठी थोडा वेळ काढा. या फावल्या वेळात व्यायाम करणे, योगासने करणे, फिरायला जाणे, विविध छंद जोपासणे अशा गोष्टी करा. नियमित व्यायाम केल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारतं. तसंच प्रजननक्षमतेस चालना देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून कमीतकमी पाच दिवस व्यायाम करणे, चालणे, धावणे, योगसाधना, पोहणे, पायलेट्स, एरोबिक्स, फंक्शनल ट्रेनिंग सारख्या शारीरिक व्यायाम करणे उत्कृष्ट पर्याय आहेत.

४. संतुलित आहाराची निवड करा-

चांगल्या आरोग्यासाठी पोषक आहार घेण्याची सवय लावा. काही व्यक्तींना टेन्शन आल्यावर त्या सतत काही ना काही खात राहतात. परंतु, जास्त खाल्ल्यामुळे किंवा अजिबातच न खाल्ल्यामुळे त्याचाही परिणाम शरीरावर होत असतो. त्यामुळे टेन्शन आल्यावर जास्त किंवा कमी खाण्यापेक्षा दररोज सकस आहार घ्या. ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे, तृणधान्य, बियाणे, शेंगदाणे आणि डाळींचा आहारात समावेश करा. आपण काय खात आहात त्यापासून आपल्याला सर्व आवश्यक पोषक मिळतात की नाही याची खात्री करा. प्रक्रिया केलेले, हवाबंद डब्यातील पदार्थ, तेलकट आणि खारट पदार्थ, धूम्रपान, जास्त प्रमाणात मद्यपान आणि उत्तेजक पेयांचे सेवन टाळा.

५. पुरेशी झोप-

झोप पूर्ण न झाल्याचा परिणाम स्त्रियांच्या गर्भधारणेवर होऊ शकतो असं अनेक अभ्यासामधून समोर आलं आहे. अपुरी झोप झाल्यामुळे ताणतणावासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दररोज किमान 8 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. मेलाटोनिन-चक्राचा प्रभाव फक्त आपल्या वजनावर नाही आणि आपले आरोग्य आणि प्रजनन क्षमतेवर होतो. त्याला "ब्युटी स्लीप" असे संबोधले जाते.

(डॉ.सुलभा अरोरा, मुंबईतील नोव्हा आयव्हीएफ येथे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com