कोरडे किंवा गळणाऱ्या नाकाने चिंतीत आहात? या उपायांचा करा वापर

कोरडे किंवा गळणाऱ्या नाकाने चिंतीत आहात? या उपायांचा करा वापर

नागपूर : कोरडे नाक (Dry nose) हा कोणताही आजार किंवा चिंता करण्याचे कारण नाही. तरीही यामुळे अस्वस्थता येते आणि लक्ष न दिल्यास संभाव्य आरोग्यास धोका असू शकतो. कोरडे किंवा गळणारे नाक अस्वस्थता आणू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे दृष्टी समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होतो. नाक ही संरक्षणाची पहिली ओळ आहे आणि निरोगी राहण्यासाठी याची काळजी (Care to stay healthy) घेणे आवश्यक आहे. कोरड्या नाकातून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपचार आहेत. (Concerned about a dry or runny nose? try this trick)

हवामान बदलल्याने त्वचा आणि केस कोरडे होण्याबरोबरच नाकाच्या आतही कोरडेपणा येत आहे. जरी या हंगामात हे अगदी सामान्य आहे, परंतु नाकात कोरडेपणामुळे, वेदना जाणवते. बऱ्याच वेळा नाक साफ करताना कोरडेपणामुळे रक्तही आत येऊ लागते आणि जखम होते. ही स्थिती अत्यंत वेदनादायक बनते. नाकातील कोरडेपणा दूर करण्यासाठी बरीच प्रकारच्या औषधे आणि थेंब बाजारात उपलब्ध आहेत. जे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरू शकता. तुम्हाला नैसर्गिकरीत्या नाकातील कोरडेपणा दूर करायचा असेल तर काही सोप्या घरगुती उपचारांचा प्रयत्न करू शकता.

कोरडे किंवा गळणाऱ्या नाकाने चिंतीत आहात? या उपायांचा करा वापर
वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

नारळाचे तेल

नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चराइझ करण्यात आणि कोरड्या पेशीमधील अंतर भरण्यास मदत करू शकते. हे नाकपुड्यांवर लावल्यास कोरडेपणा आणि वेदना कमी करण्यास मदत करते. नाकात कोरडेपणा जाणवत असल्यास रात्री झोपताना किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा एक थेंब खोबरेल तेलाचा नाकात घाला. यामुळे कोरडेपणा नाहीसा होईल. कोरडेपणामुळे नाकातून रक्त येत असेल तर तेही थांबेल आणि नाकाच्या आतील त्वचा मऊ होईल.

ऑलिव्ह तेल

उन्हाळ्यात पाणी जास्त पिणे आवश्यक आहे. जेणे करून त्वचा ओलसर राहावी. कोरडेपणा जाणवत असेल तर ऑलिव्ह तेल नाकाच्या आत लावा. यामुळे जळजळ आणि सूज आली असल्यास बरी होईल. नाकाच्या आत त्वचेवर ऑलिव्ह तेल लावल्याने चिडचिड आणि जळजळ होण्यापासून आराम मिळतो. ऑलिव्ह ऑईल त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

व्हिटॅमिन ई कॅप्सूल

तुम्हाला बाजारात व्हिटॅमिन-ई तेल कॅप्सूल अगदी सहज सापडेल. हे अँटिऑक्सिडेंट्ससाठी उत्कृष्ट स्रोत आहेत. व्हिटॅमिन ई कॅप्सूल अँटी ऑक्सीडेंट आणि अँटी इंफ्लिमेंट्री असतात. हे नाकातील कोणत्याही प्रकारची सूज किंवा जखमेला बरी करते. यासाठी नाकात हे कॅप्सूल तोडून बोटाच्या मदतीने लावा. दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास आराम मिळेल.

कोरडे किंवा गळणाऱ्या नाकाने चिंतीत आहात? या उपायांचा करा वापर
चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

तूप

तुपाचा वापर त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. परंतु, याचा वापर औषध म्हणून देखील करू शकतो. घरी जर जुने तूप असेल तर त्याचा वापर त्वचेसाठी करू शकता. तुपात जंतुनाशक गुणधर्म आहे. तसेच यामुळे दाह कमी होतो आणि रक्त वाहणे थांबविण्याची क्षमता देखील असते.

स्टीम

जर नाकाच्या आत त्वचेमध्ये कोरडेपणा असेल तर स्टीम देखील घेणे चांगला पर्याय आहे. हे कोरडे श्लेष्मा पदार्थ मऊ करते. तुम्ही डेली स्टिम घेऊ शकत नसाल तर दर दोन दिवसांनी स्टिम पाच मिनिटांसाठी घ्या. स्टीम घेतल्याने अनुनासिक रस्ता देखील पूर्णपणे साफ केला जातो.

सकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

(Concerned about a dry or runny nose? try this trick)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com