प्रयोगशाळेत तयार होण्यापासून ते तुमच्या शरीरात जाण्यापर्यंत कसा असतो कोरोना लसीचा प्रवास? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19 Vaccine Know about supply and cold chain of Corona vaccine

कोरोनाची लस तयार होण्याच्या ठिकाणापासून ते आपल्या शरीरात जाईपर्यंत नक्की काय घडतं? कशाप्रकारे कोरोना लसींना स्टोर केलं जातं? हे तुम्हाला माहितीये का? याच बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोरोना लसींचा प्रवास. 

प्रयोगशाळेत तयार होण्यापासून ते तुमच्या शरीरात जाण्यापर्यंत कसा असतो कोरोना लसीचा प्रवास? जाणून घ्या

नागपूर : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोना नावाच्या महामारीनं थैमान घातलं आहे. जगभरात लाखो लोकांचा या रोगामुळे जीव गेला आहे. काही प्रमाणात कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून आता परत वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र जगातील आणि भारतातील डॉक्टरांनी आणि संशोधकांनी दिवसरात्र एक करून कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढली आहे. भारतात लसीकरणाच्या कार्यक्रमालाही सुरुवात झाली आहे. मात्र कोरोनाची लस तयार होण्याच्या ठिकाणापासून ते आपल्या शरीरात जाईपर्यंत नक्की काय घडतं? कशाप्रकारे कोरोना लसींना स्टोर केलं जातं? हे तुम्हाला माहितीये का? याच बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोरोना लसींचा प्रवास. 

कशी तयार होते कोरोना लस? 

एका विशिष्ट प्रयोगशाळेत कोरोना प्रतिबंधक लस करण्यात येते. यानंतर या लसीचे अनेक युनिट्स तयार करण्यात येतात म्हणजेच काचेच्या एका छोट्या बाटलीमध्ये त्यांना साठवलं जातं. सध्या भारतात भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट या दोन कंपन्या कोरोना प्रतिबंधक लस बनवण्याचं काम करत आहेत. मात्र लस तयार झाल्यानंतर या लाखो युनिट्सचा प्रवास असतो तरी कसा? 

Nagpur Corona Update: सलग दुसऱ्या दिवशी तब्बल ६० कोरोना बाधितांचा मृत्यू; नवे ४,१०८ पॉझिटिव्ह 

कंटेनर्समधून सुरु होतो प्रवास 

तयार करण्यात आलेल्या कोरोनाच्या लाखो लसींना एका मोठ्या कंटेनरमध्ये साठवलं जातं. तसंच १०-१० लसींची एक कुप्पी अशाप्रमाणे कुप्पी तयार करण्यात येतात. यानंतर एका मोठ्या वातानुकूलित ट्रकमध्ये २ डिग्री ते ८ डिग्रीपर्यंत तापमानात या सर्व लसींना देशभरात पाठवलं जातं. मात्र या लसींचं तापमान २ ते ८ डिग्री सेल्सिअसमध्ये असणं अतिशय आवश्यक असतं अन्यथा लस खराब होण्याची शक्यता असते. 

आरोग्य विभागाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये मुक्काम 

नागपूरसारख्या मोठ्या शहरात एकावेळी कमीत कमी १ ते २ लाख लसी येतात. यानंतर जिल्हा आरोग्य विभागाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये या लसींना ठेवण्यात येतं. या ठिकाणी लसींना साठवून ठेवण्यासाठी मोठे डीप फ्रिझर्स असतात. या फ्रिझर्समध्ये तापमान सेट करता येतं. इथेही २ ते ८ डिग्री सेल्सिअसच्या तापमानात लसींना साठवून ठेवण्यात येतं. यानंतर सुरु होतो जिल्ह्याच्या इत्तर सर्व रुग्णलयांमध्ये लसींचा प्रवास. 

व्हॅक्सिन व्हॅनमधील प्रवास 

आरोग्य विभागाच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या कोरोनाच्या लसींचा प्रवास यानंतर व्हॅक्सिन व्हॅन्समधून होतो. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा तालुक्यांमधील इतर रुग्णालयांमध्ये कोरोना लस व्हॅक्सिन व्हॅनमधून पाठवण्यात येते. यासाठी लसींना एका व्हॅक्सिन कॅरिअरमध्ये ठेवलं जातं. या कॅरिअरमध्ये बर्फाचे ४ ट्यूब्स असतात. या ट्यूब्स कॅरिअरच्या चारही बाजूला असतात. कोरोनाच्या लसींची कुप्पी यात ठेवण्यात येते. तापमान २ ते ८ डिग्री सेल्सिअसमध्ये राहण्यासाठी बर्फाच्या ट्यूब्सचा वापर करण्यात येतो. 

तसंच कोरोना लसींना शहरातील लसीकरण केंद्रांवर आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पोहोचवण्यासाठी त्यांना महापालिकेच्या कोल्ड स्टोरेज सेंटरला पाठवण्यात येतं. इथूनच व्हॅक्सिन व्हॅन्समधून कोरोनाच्या लसीकरण केंद्रांवर जातात.    

लसीकरण केंद्रांवरही असतात डीप फ्रिझर्स

कोरोनाच्या लसींना लसीकरण केंद्रांवर आणल्यानंतर त्यांना तिथल्या डीप फ्रिझर्समध्ये साठवून ठेवण्यात येतं. जेव्हा आपण लस घेण्यासाठी केंद्रावर जातो त्यावेळी कोरोनाच्या लसींच्या कुप्पीला फ्रिझर्समधून बाहेर काढलं जातं. एका कुप्पीमध्ये साधारणतः १० लस असतात. एक कुप्पी उघडल्यानंतर ४ तासांच्या आत लसींचा उपयोग होणं आवश्यक असतं. अन्यथा लस खराब होण्याची शक्यता असते. मात्र सध्या लसीकरण केंद्रांवर गर्दी असल्यामुळे लस खराब होण्याचं प्रमाण कमीच आहे. 

आरोग्य कर्मचारी एका व्हॅक्सिन कॅरिअरमधून लस काढून इंजेक्शनच्या माध्यमातून लसीकरण करतात. मात्र यावेळी लस आणि इंजेक्शन हे नवीनच आहे ना? याची खात्री करूनच लस घेणं ही आपली जबाबदारी आहे. 

जंगलातील वणवा रोखण्यात गब्बरसिंग आणि सिंघम फेल; व्याघ्रप्रकल्पात आगीचे प्रकार सुरूच

याबद्दल नागपुरातील आरोग्य विभागाचे अधिकारी एच. आर. परचंड म्हणतात, कोरोनाचं लसीकरण संपूर्ण जिल्ह्यात सुरळीत सुरू आहे. प्रशासनाकडून, आरोग्य विभागाकडून आणि इतर सर्व लसीकरण केंद्रांकडून योग्य ती खबरदारी आणि काळजी घेण्यात येतेय. लसीकरणात कुठलीही चूक होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे काही अधिकारी सतत लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं काहीही कारण नाही.

Web Title: Covid 19 Vaccine Know About Supply And Cold Chain Corona Vaccine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaNagpur