esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Curry leaves

कढीपत्ता : वनांमध्ये आणि स्वयंपाक घरातले एक महाऔषध

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : कढीपत्ता हा भारतीय आहारातला अविभाज्य घटक आहे. ते एक सुंदर आणि साधे औषध आहे. कढीपत्त्याचे झाड बऱ्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो. त्याला बऱ्याचदा बिया लागलेल्या सापडतात. या बिया गोळा करून अंगणात लावल्या की फार चांगल्या पद्धतीने रुजतात. झाड मोठे झाले की त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात. चला तर जाणून घेऊ या याच्या लाभाविषयी...

जुलाबाचा वेग योते नियंत्रणात

जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस अर्धा कप पिला की पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतो.

पचनास चांगली मदत करतो

कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात ग्यास पकडते त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावी. यामुळे या रोगांवर आराम मिळतो.

हेही वाचा: या पदार्थांचे अतिसेवन शरीरासाठी घातक; कॅल्शिअम होते कमी

रक्तातील साखर राहते नियंत्रणात

मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावी. याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते. तसेच कोलेस्टेरॉल वाढले असेल तर कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावी.

केस गळत नाही

कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून खोबरेल तेलात मिसळून लावा. अस केल्याने केस पांढरे होत नाही. शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होईल.

कर्करोगींना मिळतो आराम

कर्करोगाने पीडित रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेतात. त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावी. यामुळे बराच आराम मिळतो.

सर्दी व खोकल्यावर करते उपाय

सर्दी व खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावी. यकृताच्या आजारात कढीपत्ता अमृत आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

हेही वाचा: दारूबंदी जिल्‍ह्यातच दारू चोरीवरून मारहाण

पित्तपासून मिळते आराम

पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.

डोळ्यांचे विकार होतात कमी

कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात. सर्वांत महत्त्वाचा फायदा हा कि कढीपत्ता टाकून न देता त्यासहित आहार घेणाऱ्या व्यक्तीला मूत्रपिंडाचे विकार जवळपास होणारच नाहीत.

जेवण लागते रुचकर

कढीपत्ता आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी वापरला जातो. प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते. त्यामुळे जेवण रुचकर लागते.

loading image
go to top