मधुमेहाने ग्रस्त आहात? सायकल चालवा आणि कमी करा मृत्यूचे प्रमाण

मधुमेहाने ग्रस्त आहात? सायकल चालवा आणि कमी करा मृत्यूचे प्रमाण

नागपूर : आजचे युग हे स्पर्धेचे आहे. यात मागे पडून नये म्हणून प्रत्येकाची धडपड सुरू असते. एकाच्या पगारात घर चालवणे कठीण असल्याने पती-पत्नी हे दोघेही नोकरी करतात. प्रत्येकाची धाव ही पैशांकडे झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा स्पर्धेच्या युगात कोणाकडेही रिकामा वेळ नाही. कमी वेळात जास्त काम करण्याकडे धाव आहे. मग अशावेळेस सायकल चालवण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही. सायकल चालवण्याचे अनेक फायदे असले तरी वेळेअभावी ते करता येत नाही.

बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह या आजाराच्या रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता, स्पर्धा या सर्व गोष्टी यासाठी कारणीभूत आहेत. मधुमेहाने त्रस्त असलेल्यांना व्यायामाची नितांत गरज असते. चालणे, धावणे, सायकलिंग करणे असे व्यायाम उत्तम आहेत.

मधुमेहाने ग्रस्त आहात? सायकल चालवा आणि कमी करा मृत्यूचे प्रमाण
यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...

सायकल चालवणे हा ॲरोबिक प्रकारचा व्यायाम आहे. सायकल चालवल्याने हृदय, फुप्फुस, मांसपेशी, हाडे आणि सांध्याचे चांगले राहतात. तसेच शरीरातील रक्तसंचार व्यवस्थित होतो. यामुळे रोज थोडा का होईना सायकल चालवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. बाहेर सायकल चालवणे शक्य नसेल तर घरच्या घरी किंवा जिममध्ये सायकल चालवली पाहिजे.

सायकल चालवल्याने लठ्ठपणा कमी होतो. तसेच हृदय देखील निरोगी राहते. बाजारात जाताना कार किंवा दुचाकीऐवजी सायकल चालवा. यामुळे मधुमेह तसेच लठ्ठपणा लवकर कमी होतो. मधुमेह रुग्ण वजनाची विशेष काळजी घेतात. सायकल चालवल्याने मधुमेही रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी होत असल्याचे पुढे आले आहे.

मधुमेहाने ग्रस्त आहात? सायकल चालवा आणि कमी करा मृत्यूचे प्रमाण
पहिल्या माळ्यावरून पडून चिमुकला ठार; भुताटकीच्या चर्चेने धरला जोर

अहवालानुसार, सायकल चालवल्याने मधुमेहावर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे हृदयविकाराच्या आजारांवर देखील मात करता येणे शक्य असल्याचे दिसून येते. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मधुमेहामुळे ग्रस्त असलेल्या एकूण ७,४५९ लोकांपैकी केवळ ५,४२३ लोकच या अभ्यासाचा शेवटपर्यंत भाग राहू शकले. ज्या लोकांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ नियमित सायकल चालवली त्यांच्या अकाली मृत्यूचा धोका ३५ टक्क्यांनी कमी झाला. वारंवार सायकल चालवणाऱ्या लोकांच्या मृत्यूचा धोका खूप कमी आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com