मूळव्याध,कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये करु नका गल्लत; जाणून घ्या दोघांमधील फरक

मूळव्याध व कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणे बऱ्यापैकी सारखी आहेत
मूळव्याध,कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये करु नका गल्लत; जाणून घ्या दोघांमधील फरक

मुंबई : आजही मूळव्याधसारख्या आजारांवर उघडपणे बोलण्यास लोक लाजतात. त्यामुळे अशा काही समस्या निर्माण झाल्यावरही अनेक जण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात. परंतु, या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पुढे गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे अनेकजण या समस्येला मूळव्याध समजून दुर्लक्ष करतात. परंतु, अशीच काहीशी लक्षणं कोलोरेक्टल कॅन्सरचीदेखील असतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं घातक ठरु शकतं. म्हणूनच, मूळव्याध व कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये फरक कोणता ते पाहुयात.

मूळव्याध आणि कोलोरेक्टल कॅन्सर यामध्ये नेमका फरक कोणता?

मूळव्याध झाल्यास गुद्द्वार जवळ खाज सुटणे आणि रक्तस्त्राव होणे, मलातून रक्त येणे, गुद्द्वाराजवळ गुठळ्या होणे आणि आतड्यांसंबंधी हालचालीदरम्यान वेदना होणे ही लक्षणे जाणवतात. याव्यतिरिक्त, कोलोरेक्टल कॅन्सर असलेल्या व्यक्तींना सुरुवातीला फारशी लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र काही कालावधीनंतर पोटदुखी, नकळत वजन कमी होणे, मलावाटे रक्त येणे, मळमळ आणि मलाशयातून रक्तस्त्राव होणे ही लक्षणे जाणवतात. विशेष म्हणजे गुदाशय रक्तस्त्राव आणि मलावाटे रक्त येणे हे मूळव्याध आणि कोलोरेक्टल कॅन्सरची सारखीच लक्षणे आहेत. पण म्हणून घाबरुन न जाता वेळीच निदान आणि उपचार करावे.

मूळव्याध,कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये करु नका गल्लत; जाणून घ्या दोघांमधील फरक
कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे काय? 'या' किरकोळ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

मूळव्याधाची कारणे :

गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की मुळव्याधीचा त्रास होतो. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो. आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असल्यामुळे बद्धकोष्ठता होते आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर द्यावा लागतो. गर्भावस्थेदरम्यानही मुळव्याधीचा त्रास उद्भू शकतो.

कोलोरेक्टल कर्करोगाची कारणे :

अनुवांशिकता आणि कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान करणे आणि ५० वर्षांपेक्षा जास्त वय तसेच एचपीव्ही व्हायरसची लागत (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस संसर्ग)

मूळव्याध व कोलोरेक्टल कर्करोगाचे निदान कसं केलं जातं?

कोलोरेक्टल कर्करोग शोधण्यासाठी, डॉक्टर आपल्या सिग्नोइडोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपीद्वारे आपल्या कोलनमध्ये पॉलीप्स अस्तित्त्वात आहेत किंवा नाही आणि ते कर्करोगाशी संबंधित आहेत की नाही याची तपासणी करतात.

उपचार :

मूळव्याध -

औषधोपचार, सिटझ बाथ घेणे, फायबरयुक्त अन्नाचे सेवन करणे, बद्धकोष्ठतेसारख्या समस्येपासून दूर राहणे, व्यायाम करणे आणि भरपूर पाणी पिणे आणि रक्तस्त्राव सारख्या शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जाऊ शकतात.

कोलोरेक्टल कर्करोग -

डॉक्टर तुम्हाला शस्त्रक्रिया, केमोथेरपी ,रेडिएशन थेरपी, टार्गेटेड थेरपी निवडण्यास सांगतील. उपचार कर्करोगाच्या स्थानावर आणि टप्प्यावर अवलंबून असतील. कोलोरेक्टल कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी वेळीच निदान करणे गजचेचे आहे. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार न करता वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

( डॉ. प्रशांत मुल्लरपाटन हे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल येथे ओंको सर्जन आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com