
खोकला ही एक समस्या आहे जी लोक खूप हलके घेतात.
सततच्या खोकल्याकडे दुर्लक्ष करणं ठरु शकतं घातक
खोकला (Cough) ही एक समस्या आहे जी लोक खूप हलके घेतात. बहुतेक लोक डॉक्टरांकडेही जात नाहीत. हिवाळ्यात (Winter) खोकल्याची समस्या सामान्य बाब आहे. परंतु जर तुमचा खोकला अनेक आठवडे बरा होत नसेल तर त्यावेळी दुर्लक्ष करुन चालणार नाही. अशावेळी, डॉक्टरांना भेटणे खूप महत्वाचे आहे. खोकल्याची अनेक कारणे असू शकतात जसे की अॅलर्जी, संसर्ग, धूम्रपान इ. अशा परिस्थितीत जर तुमचा खोकलाही बराच काळ बरा होण्याचे नाव घेत नसेल, तर त्याचे कारण जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
हेही वाचा: Winter Care: सर्दी खोकला झाल्यामुळे वैतागले आहात? हे सहा उपाय करा
खोकल्याचे प्रकार
- तीव्र खोकला (Acute Cough)- तो सुमारे 2 ते 3 आठवडे राहून स्वतःच बरा होतो.
- सबक्युट खोकला (Subacute Cough)- हा सुमारे 3 ते 8 आठवडे टिकू शकतो.
- क्रॉनिक खोकला (Chronic Cough)- तो 8 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो आणि काही मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.
हेही वाचा: सर्दी-खोकला-तापावर जालीम उपाय, ट्राय करा 5 प्रकारचे काढे
तीव्र खोकल्याची कारणे (Causes Of Chronic Cough)
धुम्रपान (Smoking) - दीर्घकाळ खोकला येण्याचे मुख्य कारण धूम्रपान हे देखील असू शकते. धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये खोकल्याची समस्या कायम राहते. कारण तंबाखूमध्ये असलेल्या रसायनांमुळे फुफ्फुसात जळजळ होते. अनेक वेळा धूम्रपान करणारे त्यांच्या खोकल्याकडे लक्ष देत नाहीत, ज्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात.
कोविड 19 (Covid 19)- दीर्घकाळ खोकल्याचे एक कारण म्हणजे कोविड-19 हे देखील आहे. खोकला हे कोविड 19 च्या इतर लक्षणांपैकी एक आहे. कोविड-19 मुळे होणारा खोकला सामान्य फ्लूपेक्षा जास्त काळ टिकू शकतो. कोरडा खोकला त्याच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे.
इन्फेक्शन (Infection)- इन्फेक्शनमुळे होणारी सर्दी बरी झाल्यानंतरही खोकल्याची समस्या दीर्घकाळ टिकून राहते. या प्रकारचा खोकला कधीकधी 2 महिने टिकू शकतो. ज्यामध्ये श्वसनमार्गामध्ये जळजळ होते आणि तुम्हाला खोकल्याची समस्या असू शकते. जे, कमी होण्यासाठी वेळ लागतो.
हेही वाचा: सुख म्हणजे नक्की काय असते? ना ताप, ना खोकला अन् चव असते
दमा (Asthma)- श्वासोच्छवासाच्या वेळी आपण जे श्वास घेतो ती नाक, घसा आणि फुफ्फुसात जाते. दम्यामध्ये वायुमार्गाच्या आसपासचे स्नायू आकुंचन पावू लागतात. दम्याच्या रुग्णाला खूप खोकला येतो. दम्यामध्ये, कोरडा आणि ओला दोन्ही खोकला होऊ शकतो. पण कोरडा खोकला खूप सामान्य आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग (Lung cancer)- फुफ्फुसाचा कर्करोग हे दीर्घकाळ खोकल्याचे कारण असू शकते. फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास, खोकताना तोंडातून रक्त देखील येऊ शकते. पण जर तुम्ही धूम्रपान करत नसाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही फुफ्फुसाचा कर्करोग झाला नसेल, तर तुमच्या खोकल्यामागे आणखी काही कारण असू शकते. तसे, धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे. परंतु पॅसिव स्मोकिंग आणि वेगाने वाढणारे वायू प्रदूषण यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या बाबतीत बरेच काही दिसून येत आहे.
डॉक्टरांना कधी दाखवाल
सहसा, खोकला काही दिवसातच बरा होतो, परंतु जर तुम्हाला 3 ते 4 आठवडे खोकल्याचा त्रास होत असेल तसेच श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकताना तोंडातून रक्त येत असेल तर वेळ न करता ताबडतोब डॉक्टरांना भेटावे.
Web Title: Do Not Ignore Persistent Coughing Can Be Harmful To Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..