हेल्दी डाएट : उन्हाळ्यासाठी नाचणी आंबिल

नाचणी आंबिल ही एक पारंपारिक महाराष्ट्रीय रेसिपी आहे. ही लापशी पाककृती चवदार आणि आरोग्यदायी आहे.
Nachani Aambil
Nachani AambilSakal
Summary

नाचणी आंबिल ही एक पारंपारिक महाराष्ट्रीय रेसिपी आहे. ही लापशी पाककृती चवदार आणि आरोग्यदायी आहे.

- डॉ. रोहिणी पाटील

नाचणी आंबिल ही एक पारंपारिक महाराष्ट्रीय रेसिपी आहे. ही लापशी पाककृती चवदार आणि आरोग्यदायी आहे. उन्हाळ्यात हे आंबिल घेण्याचा सल्ला दिला जातो. ते नियमित खाल्ल्यास उन्हाळ्यातील समस्या नियंत्रणात राहू शकतात.

नाचणी अंबिलचे फायदे

  • हे ग्लूटेन मुक्त आणि आयर्नचा उत्तम स्रोत आहे.

  • यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

  • फायबरचे उच्चप्रमाण असल्याने गरजेपेक्षा जास्त खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.

  • रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

  • लहान मुलांसाठी निरोगी अन्न.

  • नाचणीमध्ये ‘व्हिटॅमिन बी ३’ असते, जे त्वचेच्या निरोगी निर्मितीस मदत करते आणि सुरकुत्या आणि त्वचा रोग टाळते.

  • नाचणी पिठात शरीरात न विरघळणारे फायबर असते, ज्यामुळे पचन सुलभ होते आणि बद्धकोष्ठता दूर राहते.

नाचणी आंबिलची रेसिपी

सर्व्हिंग आकार - १ व्यक्ती

साहित्य:

  • २ चमचे सेंद्रिय नाचणी पीठ

  • २ कप पाणी

  • २ पाकळ्या किसलेला लसूण

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • जिरे पावडर

  • खडे मीठ/ सैंधव/ गुलाबी मीठ चवीनुसार

  • घरी बनवलेले ताक

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

  • एका भांड्यात नाचणीचे पीठ घेऊन त्यात पाणी घाला.

  • नीट मिक्स करून आंबवण्यासाठी रात्रभर भिजत ठेवा.

  • दुसऱ्या दिवशी सकाळी अजून थोडे पीठ आणि पाणी घालून ठेवा.

  • तुम्ही ताकामध्ये नाचणीचे पीठ भिजवू शकता.

  • एका भांड्यात पाणी घेऊन ते गरम करा.

  • पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करा आणि रात्रभर भिजवलेली नाचणीची पेस्ट त्यात घाला, सतत ढवळत राहा. एका वेळी थोडी पेस्ट घालून नीट ढवळून घ्या जेणेकरून त्यात गुठळ्या तयार होणार नाहीत. गॅस चालू करा.

  • किसलेला लसूण, हिरवी मिरची आणि जिरेपूड, सैंधव किंवा गुलाबी मीठ घालून चांगले मिसळा.

  • मंद ते मध्यम आचेवर सुमारे ८-१० मिनिटे मिश्रण चांगले शिजेपर्यंत ठेवा. शिजवताना सतत ढवळत राहा.

  • आंबिल घट्ट झाल्यावर आणि नाचणीचे पीठ चांगले शिजल्यावर गॅस बंद करा.

  • मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जास्त वेळ शिजवू शकता.

  • पण जसजसे मिश्रण थंड होते तसतसे ते घट्ट होते. त्यामुळे तुम्हाला ते मिश्रण किती घट्ट हवे आहे ते बघा.

  • आंबिल पूर्णपणे थंड झाल्यावर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

  • सर्व्हिंग ग्लासमध्ये आंबिल घालून त्यात ताक घाला.

  • नीट मिक्स करून त्यावर कोथिंबीर घालून सजवा.

  • नाचणीचे आंबिल तयार आहे.

मिळणारी पोषक तत्त्वे

  • कॅलरीज (ऊर्जा) - ८५.५ किलो कॅलरी

  • प्रथिने - ३.७ ग्रॅम

  • कर्बोदके - १५.७ ग्रॅम

  • फॅट - ०.८ ग्रॅम

  • फायबर - ०.५ ग्रॅम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com