वाढलेलं वजन आता येईल नियंत्रणात; आहारात करा चण्यांचा समावेश

भिजवलेले चणे खाण्याचे गुणकारी फायदे
soaked Chickpea
soaked Chickpea

कोणत्याही आजारापासून किंवा विषाणूपासून दूर रहायचं असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश करण्याचा सल्ला वारंवार डॉक्टरांना कडून देण्यात येतो. मात्र, अनेक जणांना कडधान्य फारसे आवडत नाहीत. परंतु, कडधान्य खाण्याचे नेमके फायदे काय हे जर एखाद्याला पटवून दिलं. तर, नक्कीच आजपासून प्रत्येक जण आहारात कडधान्यांचा समावेश करेल. म्हणूनच, आज आपण भिजवलेल्या हरभऱ्यांचे ( चणे) शारीरिक फायदे कोणते ते पाहुयात. (Eating soaked Chickpea is beneficial for health)

भिजवलेले हरभरे खाण्याचे फायदे

१. वजन नियंत्रणात राहते -

ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे. त्यांनी आठवड्यातून दोन वेळा तरी भिजवलेले चणे नक्कीच खावेत. चण्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असते, ज्यामुळे आपल्या भूकेवर नियंत्रण मिळते. म्हणूनच, चणे खाल्ल्यावर आपल्याला लगेच भूक लागत नाही. परिणामी, योग्य प्रमाणात आहार घेतल्यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहतं.

soaked Chickpea
'ही' चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी

२. अशक्तपणा दूर होतो -

चण्यांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सहाजिकच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीदेखील आपोआप वाढते. शरीरातील हिमोग्लोबिन वाढलं की रक्ताची कमतरतादेखील भरून निघते. म्हणूनच, जर शरीरात रक्त, लोह व हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असेल तर विनाकारण येणारा शारीरिक थकवा, अशक्तपणा दूर होतो.

३. बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते -

योग्य पद्धतीने अन्नपचन न झाल्यास सहाजिकच बद्धकोष्ठता किंवा पोटासंबंधीचे विकार डोकं वर काढतात. परंतु, भिजवलेल्या चण्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पचनक्रियेशी निगडीत समस्या दूर होतात. म्हणून भिजवलेले चणे नक्की खावेत. मात्र, त्याचा अतिरेक होणार नाही याकडेही लक्ष द्यावं.

४. डोळ्याच्या तक्रारी दूर होतात -

चण्यांमध्ये कॅरोटीन हा घटक असतो. ज्यामुळे डोळ्यांच्या पेशींना पोहोचणाऱ्या नुकसानापासून तो संरक्षण करतो. त्यामुळे चण्यांमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com