esakal | Egg Benefits: 'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे'; जाणून घ्या फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

Egg

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे'; जाणून घ्या फायदे

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

अंडी हा सुपरफूड मानला जातो, जो आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवतो. म्हणूनच असे म्हटले जाते की संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. पण तुम्हाला माहितेय का नाश्त्यात रोज 2 अंडी खाल्ल्याने तुम्हाला किती फायदे मिळतात. दररोज 2 अंड्यांचे सेवन केल्याने तुमचे वजन संतुलित राहण्यास आणि रोगांपासून दूर होण्यास मदत होते. चला तर मग अंडी खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

हेही वाचा: माध्यान्ह आहारासोबत मिळणार अंडी

अंड्यांमध्ये किती पोषण असते?

तज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज नाश्त्यात 2 अंडी खाल्ल्यास तुम्हाला प्रथिने, कॅल्शियम, जस्त, सेलेनियम, फॉस्फरस, हेल्दी फॅट्स इत्यादी पुरेशा प्रमाणात मिळतात. त्याच वेळी, व्हिटॅमिनमध्ये, आपल्या शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 9 (फोलेट) देखील मिळते.

हेही वाचा: मिरचीची अंडी, अॉम्लेट स्नॅक्स ट्राय तर करून पहा

दररोज नाश्त्यामध्ये दोन अंडी खाण्याचे फायदे...

- अंड्यात असलेले प्रोटीन हळूहळू पचते आणि शरीराला ऊर्जा देते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक फील वाटेल.

- अंड्यांमध्ये मजबूत हाडे, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने यासाठी आवश्यक तीनही घटक असतात. त्यामुळे हाडांमधील कमजोरी दूर करण्यासाठी अंड्यांचे सेवन करणे उत्तम.

- अंड्यामुळे नर्वस सिस्टम ही हेल्दी राहते. अंड्यातील पिवळे बलक मध्ये उपस्थित कोलीन एक आवश्यक पोषक आहे, जे नर्वस सिस्टमसाठी आवश्यक आहे.

- अंडी तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ज्यामुळे तुम्ही रोग आणि इन्फेक्शनपासून दूर राहाल.

- अंड्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याच्या आहारात ते सहज वापरू शकता.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top