esakal | आरोग्यवर्धक अंजीर 
sakal

बोलून बातमी शोधा

figs and its benefits

अशी मान्यता आहे कि, अंजिराचीही लागवड प्राचीन काळापासूनची आहे. ईजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व काळात चार हजार वर्षापूर्वीपासून अंजीर पिकवत असत. हजारो वर्षे मध्य पूर्वेकडील देशांत ते प्रमुख अन्नापैकी एक मानले जाई.

आरोग्यवर्धक अंजीर 

sakal_logo
By
प्राजक्ता निपसे

पुणे : फळांत अंजिराचेही महत्त्व पूर्वापार पुष्कळच आहे. मऊ, गोड आणि रसाळ असे हे फळ पौष्टिक व आरोग्यवर्धक आहे. मोदकाचा आकार, गोड गर व त्यात पुष्कळ बारीक पिवळया बिया असे हे फळ आहे.

पिकलेलं ताजं अंजीर गोड, चविष्ट असे असतं. मात्र हे फळ लवकर खराब होणारं असल्याने पिकेल तिथेच आसपास ताज्या स्वरूपात विकलं जातं. दूरवर ती सुकवूनच पाठवतात. म्हणजे ताजी फळ जास्त काळ टिकून राहत नाही. 

आपल्याकडे आज महाराष्ट्रात पुणे, कर्नाटकात श्रीरंगपट्टमण, उत्तर प्रदेशात लखनौ येथे व गुजरात येथेही काही ठिकाणी अंजिराचे पीक घेतात.

»  अंजीरमध्ये आद्रता बरीच असून पिष्टमय पदार्थ, मेद व काही प्रमाणात प्रथिने आहेत.

»  अंजीर स्वतंत्रपणे वा इतर अन्नपदार्थाबरोबर खाल्यास त्याची पौष्टिकता वाढते.

»  केक, जॅम, पुडिंग करताना अंजिराचा वापर करतात. लहान मुलांना अंजिरचे चॉकलेट, कुकीज , लाडू बनवून दिल्यास ते आवडीने खातात. 

»  आजारात शरीराची झालेली हानी भरून काढून प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यास मदत होते. 

»  ओठ, जीभ व तोंड यांना चिरे पडत असल्यास अंजिराने ते भरून येतात.

»  अंजिरातील बारीक बियांमध्ये आतडयातील आकुंचन-प्रसरणाची क्रिया वेगाने करण्याचा गुण असल्याने पचनसंस्था स्वच्छ राहते. म्हणजे पुढे जाऊन मूळव्याधीचा त्रास होणार नाही . 

»  सारक गुणामुळे मूळव्याधीवर अंजीर हे उत्तम औषध आहे. दोन-तीन अंजीर रात्री पाण्यात भिजत टाकून सकाळ, संध्याकाळी तेच गरम पाण्याने धुवून खावे. यामुळे मळाचा कडकपणा कमी होऊन आतडयाचा दाह होत नाही. असे चार आठवडे खाल्यास मूळव्याधीचा बीमोड होतो.

हेही वाचा : मोड आलेलेअसे हिरवे मुग ठेवतील तुम्हाला विविध आजारांपासून दूर 

»  दम्यावरही अंजीर गुणकारी आहे.

»  अंजीर, खजूर, बदाम व लोणी एकत्र करून खावे.

»  पायांना होणा-या कुरुपांना कच्च्या अंजिराचा चीक लावावा.

»  अंजीर वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं.

»  भिजवलेले अंजीर पचायला सुलभ असतात. म्हणूनच रात्रभर तुपामध्ये भिजवलेले अंजीर हे सकाळी खाल्यास त्याचे गुणधर्म वाढतात.

संपादन - सुस्मिता वडतिले  

loading image
go to top