फिट है तो हीट है : मानसी कुलकर्णी

शब्दांकन : अरुण सुर्वे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

सध्या मी "स्टार भारत' या हिंदी वाहिनीवरील "सावधान इंडिया' या मालिकेत प्राजक्ता भोसले या पोलिस निरीक्षकाची भूमिका साकारत आहे. खरंतर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी तशीच देहबोली, आवाज, राहणीमान अन फिट राहणं गरजेचं असतं. त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारलं अन हेवी वर्कआऊट करून यशस्वीरीत्या पारही पाडत आहे. जर जीमला जाणं शक्‍य झालं नाही तर मी सायकलिंग किंवा वॉकिंग करते. मात्र, स्वतःसाठी अन स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ न काढणं हे पूर्णतः चुकीच आहे.

लोगो : माझा फिटनेस

प्रत्येक कलाकारानेच नव्हे तर प्रत्येक माणसाने आपला फिटनेस जपणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी दिवसातून काही वेळ आपल्या स्वतःसाठी काढावा. कलाकारांना तर चित्रीकरण, कार्यक्रम व व्यग्र दिनक्रमातून वेळ काढणे खूपच कठीण जाते. पण, बहुतांश सर्वच कलाकार फिटनेस अन वेलनेसकडे आवर्जून लक्ष देतात.

मोहन भागवतांच्या वक्तव्याला सोनम कपूर म्हणाली 'फुलिश'

सध्या मी "स्टार भारत' या हिंदी वाहिनीवरील "सावधान इंडिया' या मालिकेत प्राजक्ता भोसले या पोलिस निरीक्षकाची भूमिका साकारत आहे. खरंतर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी तशीच देहबोली, आवाज, राहणीमान अन फिट राहणं गरजेचं असतं. त्यामुळे मी हे आव्हान स्वीकारलं अन हेवी वर्कआऊट करून यशस्वीरीत्या पारही पाडत आहे. जर जीमला जाणं शक्‍य झालं नाही तर मी सायकलिंग किंवा वॉकिंग करते. मात्र, स्वतःसाठी अन स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ न काढणं हे पूर्णतः चुकीच आहे.

फिट राहण्यासाठी दिवसभरात मी दीड तास व्यायाम करते. मला क्रॉस फिट ऍक्‍टिव्हिटी खूप आवडते. मालिकांचं चित्रीकरण सलग चालतं. त्यामुळे क्रॉस फिट ऍक्‍टिव्हिटी खूपच फायदेशीर ठरते. त्यातून ऊर्जा अन शारीरिक क्षमताही वाढते. मुळात मी खूपच चंचल आहे. त्यामुळे मला फास्ट गोष्टींची गरज असते. त्यासाठी मी ऍरोबिक्‍सही करते. मध्यंतरी मी योगसनांचाही प्रयत्न केला होता. पण, ते शक्‍य झालं नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आहार ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे सकाळी मी हळद व मीठ टाकून कोमट पाणी पिते. झोपण्यापूर्वीही गरम पाणी पिते. ग्रीन टी व सलाडचा आहारात नेहमीच समावेश असतो. दिवसभरात मी दोन ते अडीच लिटर पाणी हमखास पिते. फळे, कच्च्या भाज्या खाणे हे केस व त्वचेसाठी खूपच महत्त्वाचे आहे. आहारामध्ये कोशिंबिरीचाही समावेश करते.

चित्रीकरणामुळे अनेकदा खाण्यापिण्याचं गणित बिघडल जातं. पण, मी सेटवरील जेवण न घेता घरून बनविलेला डबाच खाते. मात्र, माझा तोंडावर ताबा राहत नाही. पण, त्यासाठी मी वर्कआऊट करते. आपलं शारीरिक अन मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी फास्टफूड व बाहेरचं खाणं टाळते. त्यासाठी मला जे पाहिजे ते मी घरीच बनविते अन ते हेल्दीही असते. आहारात दोन पोळ्या, भाजीचा समावेश असतो. मात्र, भात खात नाही. या सर्व गोष्टी करत असल्यामुळेच मी फिट आहे.

प्रेम संबंधातून बहिणीच्या प्रायव्हेट पार्टवर झाडली गोळी...

दरम्यान, आहाराबरोबरच मनःशांतीसाठी मला चांगल्या गोष्टी करायलाही आवडतात. अनेकदा मी संगीत ऐकते, वाचन करते. त्याचबरोबर नाटक, सिनेमाला जाते. त्यातूनही मला सकारात्मक ऊर्जा मिळते. शेवटी ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, त्या गोष्टी करत राहाव्यात. कारण, अशा गोष्टी आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी गरजेच्या असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fitness tips from Manasi Kulkarni