esakal | 'या' पाच कारणांमुळे होतात पोटाचे आजार, आपल्या आतड्यांना 'असे' ठेवा सुरक्षित

बोलून बातमी शोधा

five ways to safe our gut nagpur news}

आपण कुठल्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, तसेच आपली जीवनशैली कशी आहे? यावर आतड्याचे आरोग्य अवलंबून असते. एकूणच आतडे चांगले, तर शरीर सुदृढ असते. आपल्या आतड्यांना धोका पोहोचवणारे पाच घटक असून त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

'या' पाच कारणांमुळे होतात पोटाचे आजार, आपल्या आतड्यांना 'असे' ठेवा सुरक्षित
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आपल्या शरीराचे संतुलन राखण्यासाठी आतडे महत्वाची भूमिका बजावत असतात. आतड्यांमध्ये दोन्ही चांगले आणि वाईट असे दोन्ही बॅक्टेरिया असतात. त्यामध्ये ८५ टक्के चांगले, तर १५ टक्के वाईट बॅक्टेरियाचा समावेश असते. आपण कुठल्या खाद्यपदार्थांचे सेवन करतो, तसेच आपली जीवनशैली कशी आहे? यावर आतड्याचे आरोग्य अवलंबून असते. एकूणच आतडे चांगले, तर शरीर सुदृढ असते. आपल्या आतड्यांना धोका पोहोचवणारे पाच घटक असून त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

आपला आहार -
आतडे हे लाखो बॅक्टेरियांचे घर आहे. जीवंत राहण्यासाठी जेवणे गरजेचे असते. त्याच जेवणावर हे बॅक्टेरिया जगत असतात. यामध्ये प्रोबायोटीक आणि प्रीबायोटिक अशा दोन्ही प्रकारचे जेवणे आपल्या आतड्यांना सुदृढ ठेवण्याचे काम करत असते. त्यामुळे खाद्यपदार्थ खातांना व्यवस्थित काळजी घ्यायला हवी. यामध्ये जास्तीत जास्त कच्च्या पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. कच्चे पळ, भाज्या, ताक, दही, कांदा लसूण आदी खाद्यपदार्थ आपल्या आतड्यांना हेल्दी ठेवण्याचे काम करत असतात.

हेही वाचा - ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होईल कमी; योगाचे 4 प्रकार ठरतील फायद्याचे

रोगांचे माहेरघर -
अनेक रोगांचं माहेरघर हे आतडे असतात. यामधूनच अनेक रोगांचा जन्म या आतड्यांमधूनच होत असतो. वाढत्या वयासोबत आतड्यांची काळजी घेतली नाहीतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

शारीरिक हालचाली -
जेवल्यानंतर चालायला पाहिजे. त्यामुळे आपली पचनसंस्था चांगले काम करते. मात्र, चालायचे किती यालाही काही नियम आहेत. जास्त चालल्यामुळे देखील कब्जाची समस्या उद्भवू शकते.

हेही वाचा - रात्री उशिरापर्यंत पुरुषांनी करू नये 'हे' काम; नाही तर गंभीर समस्येला जावे लागेल सामोरे

ताणतणाव -
तुम्हाला जर जास्त ताण जाणवत असेल तर त्याचा परिणाम हा आतड्यांवर होत असतो. त्यामुळे तुमची पचन क्षमता कमजोर होऊ शकते. तुमच्या मेंदूचा संबंध हा आतड्यांशी असतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केल्यास आतड्यावर त्याचा परिणाम होतो.

दातांचे आरोग्य -
आतड्यांचे आरोग्य राखायचे असेल तर दातांचे आरोग्य राखणे देखील महत्वाचे आहे. कारण आपण जे काही खाद्यपदार्थ खात असतो ते दातांमध्ये अडकून राहतात. पाणी प्यायल्यानंतर ते पोटात जातात. ते तर जास्त दिवसांचे असतील तर त्यामुळे आतड्यांसाठी धोकादायक असू शकते. 

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)