रात्री उशिरापर्यंत पुरुषांनी करू नये 'हे' काम; नाही तर गंभीर समस्येला जावे लागेल सामोरे

study claims using gadgets late at night can cause male infertility Marathi article
study claims using gadgets late at night can cause male infertility Marathi article

प्रगत तंत्रज्ञानामुळे आपली दैनंदीन कामे खूपच सोपी झाली आहेत. पण आज त्याचा अतिवापराचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहे. ऱात्री  उशीरपर्यंत फोन आणि इतर उपकरणे वापरल्याने पुरुषांना अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते, आज आपण अशाच गंभीर समस्येबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

वैवाहिक जीवन जगणाऱ्या पुरुषांच्या आयुष्यात तर या सवयीमुळे मोठ्या अडचणी येऊ शकतात.  जर तुमचाही पार्टनर रात्री  फोनचा अति वापर करत असेल, तर तो तात्काळ थांबवायाला सांगा. कारण या सवयीचा थेट परिणाम हा पुरुषांच्या स्पर्म गुणवत्तेवर होतो.  नुकतेच प्रसिध्द झालेल्या Virtual Sleep 2020 च्या आभ्यासानुसार याचा खुलासा करण्यात आला आहे. य़ा रिपोर्टमध्ये सांगितल्याप्रमाणमे जे पुरुष रात्री डिजिटल गॅजेट्स वापरतात किंवा त्यांच्या  संपर्कात राहतात त्यांना इनफर्टिलीटीचा धोका जास्त असतो. मात्र हा पुर्णतः संशोधनाचा विषय आहे. 

WHO चे आकडे काय सांगतात?
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी पाहिल्यास असे दिसून आले आहे की वंध्यत्वामुळे पीडित पुरुष आणि स्त्रिया जगभरात 15 ते 20 टक्के आहेत. पण जेव्हा आपण पुरुषांबद्दल बोलतो तेव्हा हे आकडे भीतीदायक आहेत. पुरुषांमध्ये इनफर्टिलीटीचा  दर 20 ते 40 टक्क्यांपर्यंत आहेत. यामध्ये भारतातील पुरुष एकूण 23 टक्के आहेत.

इनफर्टिलीटीची करणे कोणती?

इनफर्टिलिटीचे एकमेव कारण रात्री उशीरपर्यंत गॅझेट वापरणे एवढेच आहे असे नाही.  यामागे इतर अनेक कारणे असू शकतात जसे की धूम्रपान, मद्यपान आणि खराब जीवनशैली इ. परंतु ही सर्व कारणे पाहून आपण अलीकडील संशोधन हलक्यात घेऊ शकत नाहीत.या अभ्यासानुसार रात्री उशीरापर्यंत डिजिटल उपकरण वापरण्याचा परिणाम स्पर्म मोटिलिटी, प्रोग्रेसिव स्पर्म मोटिलिटी आणि स्पर्म कंस्ट्रेशन यावर होतो. डिजिटल डिव्हाइसमधून एक शॉर्ट-वेव्हलेन्थ लाइट (एसडब्ल्यूएल) नावाचा प्रकाश बाहेर पडतो. या प्रकाशाच्या जास्त संपर्कात रहाल तितकेच त्याचा आपल्या शुक्राणूच्या गुणवत्तेवर परिणाम होते असे अभ्यासात समोर आले आहे. 

झोपेवर वाईट होतो परिणाम 

इतकेच नाही तर वेगवेगळ्या रंगाचे दिवेही प्रजननक्षमतेवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, संध्याकाळी किंवा रात्री अधिक शॉर्ट-वेव्हलेन्थ लाइट वापर केल्यास मेलाटोनिनचा प्रवाह कमी होतो. हे मेंदूच्या पीनियल आर्थरायटीसद्वारे निर्मित एक हार्मोन आहे. यामुळे, केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियांच्या झोपेवर देखील वाईट परिणाम होतो. यामुळे एकतर ती व्यक्ती बराच वेळ झोपून राहते किंवा त्याची झोप कमी होऊ लागते. यामुळे प्रजननक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.

या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

आजच्या आधुनिक युगाने आपल्याला गॅझेटवर पूर्णपणे अवलंबून आहोत. ज्यामुळे आपण केवळ आपली क्षमता गमावत नाही तर आजारी देखील पडत आहोत. अधिक लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर हा देखील आपल्या डीएनएवर परिणाम करतो. बर्‍याच वेळा यामुळे गर्भपात देखील होतो. संध्याकाळी ही डिजिटल डिव्हाइस वापरण्यात कोणतीही अडचण नाही. रात्री उशिरा डिजिटल उपकरणांच्या वापराबाबत अजून संशोधन होणे बाकी आहे. परंतु आपण ही सवय सोडल्यास आपल्यासाठी ते अधिक चांगले होईल. निरोगी शरीर आणि मनासाठी महत्वाचे आहे की आपल्याला दररोज चांगली झोप मिळते. आपण रात्री उशीरापर्यंत काम करत राहिल्यास आपल्या चांगल्या भविष्यासाठी आपण डॉक्टरांचा किंवा एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com