हायपरटेन्शनने त्रस्त आहात? फॉलो करा तज्ज्ञांच्या 'या' टीप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tension

हायपरटेन्शनने त्रस्त आहात? फॉलो करा तज्ज्ञांच्या 'या' टीप्स

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेलं कोरोनाचं चक्र अद्यापही थांबलेलं नाही. या विषाणूमुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. सहाजिकच वारंवार भीती, काळजी व चिंता केल्यामुळे नागरिकांमध्ये आता रक्तदाब, हायपरटेन्शन अशा गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. हायपरटेन्शन किंवा अतिरक्तदाब ही भारतात नेहमीच गंभीर वैद्यकीय अवस्था समजली जाते. या अवस्थेमुळे हृदय, मूत्रपिंड, मेंदू आणि अन्य अवयवांना असलेला विकारांचा धोका बराच वाढतो. अनेक जणांना तणाव, अनारोग्यकारक आहार यांमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, तर काही जणांना आनुवंशिकतेने हा त्रास होतो. म्हणूनच, हायपरटेन्शनवर (hypertension) नियंत्रण मिळवण्यासाठी इंडस हेल्थ प्लसचे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तज्ज्ञ अमोल नायकवडी यांनी काही टीप्स सांगितल्या आहेत. (follow this 6 tips in your daily routine for hypertension)

१. योग्य आहार घेऊन आरोग्य चांगले राखणे-

रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीनुसार डॉक्टर त्यांचा डाएट प्लॅन तयार करुन देतात. यात बऱ्याचदा पोटॅशिअमचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करण्याचा सल्ला देतात. तसंच संत्री, केळी, पालक, ब्रोकोली आदींमध्ये पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.

२. सोडिअमयुक्त अन्नपदार्थ टाळणे-

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी मीठाचा वापर कमी करणे. तसंच हवाबंद डब्यातील पदार्थदेखील चुकीनही खाऊ नये.

हेही वाचा: White Fungus: म्युकोरमायकोसिसनंतर आणखी एक नवा आजार

३. शारीरिक व्यायाम करणे -

प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केलाच पाहिजे. जेवढा व्यायाम अधिक केला जाईल, तेवढे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे सोपे होईल. आठवड्यातून चार दिवस ३० मिनिटे सौम्य स्वरूपाचे व्यायाम केले तरीही शरीरात बदल घडून येतात.

४. पुरेशी झोप घेणे -

झोपेचा आरोग्याशी थेट संबंध आहे. ८ तास व्यवस्थित झोप घेतल्यास रक्तदाब आटोक्यात ठेवण्यात मदत होते. सहा तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींच्या रक्तदाबात जलदगतीने वाढ होते. झोपेच्या स्थितींवर बरीच माहिती उपलब्ध आहे. झोपताना शरीराचे आरेखन योग्य राखल्यास हायपरटेन्शनच्या व्यवस्थापनात मदत होऊ शकते.

५. वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे -

कुटुंबातील इतिहास व जनुकीय रचना हे बहुतेक आजारांबाबत धोक्याचे घटक असतात. तुमची एकंदर आरोग्यविषयक पूर्वस्थिती जाणून घेण्यासाठी जेनेटिक टेस्टिंग किंवा जनुकीय चाचण्या उपयुक्त ठरतात, कारण हायपरटेन्शनसारख्या अवस्थांचा परिणाम दृष्टी, मूत्रपिंड आणि हृदयासारख्या अन्य अवयवांवर होतो. संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेतल्यास तुम्हाला योग्य जीवनशैली आखण्यात आणि वैद्यकीय अवस्थांचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यात मदत मिळते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी आपला रक्तदाब आणि अन्य संबंधित आरोग्य अवस्थांसाठी नियमित तपासण्या करून घेत राहणे उत्तम.

६. औषधे नियमित घेणे -

हायपरटेन्शनच्या रुग्णांनी रक्तदाबाची पातळी सामान्य असतानाही नियमित औषधे घेतली पाहिजेत. औषधांमध्ये काही बदल असल्यास त्यांनी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पण चालू असलेली औषधे त्याशिवाय थांबवू नयेत.

loading image
go to top