esakal | पचनशक्तीला फार महत्त्व : खाण्यापिण्याचे काही नियम, आहार कसा असावा?
sakal

बोलून बातमी शोधा

पचनशक्तीला महत्त्व : खाण्यापिण्याचे काही नियम, आहार कसा असावा?

पचनशक्तीला महत्त्व : खाण्यापिण्याचे काही नियम, आहार कसा असावा?

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : आयुर्वेदामध्ये अग्नी म्हणजे पचनशक्तीला फार महत्त्व आहे. कडक भूक लागणे हे उत्तम आरोग्याचे एक लक्षण आहे. मग आम्ही भूक नसताना फक्त जेवणाची वेळ झाली म्हणून जेवतो. ही झाली चुकीचा आहार घेण्याची पद्धत. तसेच वारंवार जेवणे, थंड व गरम एकत्र करून खाणे, विरुद्ध आहार घेणे, आवडीचा पदार्थ दिसला की भरपेट खाणे, कडक भूक लागली असता न खाणे, भुकेची वेळ निघून गेल्यावर खाणे, ऋतू विपरीत खाणे. त्यामुळे आहार घेताना काय खावे आणि काय खाऊ नये, याचाही विचार महत्त्वाचा आहे. (Food-News-Immunity-Ayurvedic-diet-Health-News-nad86)

अँटीजेन्सशी लढण्यासाठी आणि आरोग्य निरोगी राखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती केवळ व्हायरल इन्फेक्शन्सपासूनच आपले संरक्षण करीत नाही तर त्याचे बळकट असणे आतड्याच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेदिक डाएटचा आधार घेता येतो.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

दैनंदिन आहारात आयुर्वेदिक डाएट फॉलो केला तर शरीराला केवळ अतिरिक्त आरोग्यदायी लाभच पुरवत नाही तर यामुळे पाचनं तंत्रामध्येही सुधारणा होते. प्रत्येकाने आपल्या शरीराच्या रचनेच्या आधारावरच आहार घेतला पाहिजे. कारण, खाण्यापिण्याचे देखील काही नियम असतात. येथे काही आयुर्वेदिक आहाराचे नियम दिले आहेत जे आपले पाचक आरोग्य सुधारतील.

जेवणात लस्सी, ज्यूस टाळा

पूर्वीच्या जेवणाचे पूर्णपणे पचन होईपर्यंत पुन्हा काहीही खाऊ नये. यासोबतच जेवणानंतर अनावश्यकपणे काहीही खाणे कटाक्षाने टाळावे. भूक लागल्यावरच मर्यादित प्रमाणातच खावे. डिहायड्रेशनमुळे सहसा आपल्याला भूक लागते. म्हणून जेवणा दरम्यान लस्सी किंवा इतर ज्यूस वगैरे सारख्या प्रोबियटिक्सची निवड करू शकता.

शांत वातावरणात जेवण करा

निवांत आणि शांत वातावरणातच जेवण करत आहोत ना याची खात्री करा. बरेच लोक खाताना टीव्ही, फोन किंवा लॅपटॉप घेऊन बसतात. परंतु, आयुर्वेदाच्या काही खास नियमांनुसार जेवण करताना एकमेकांशी बोलणे किंवा कोणत्याही प्रकारचे डीजिटल उपकरण वापरणे अजिबात योग्य नाही.

हेही वाचा: मुलांनो तुमच्यासाठी : करा कोणतीही हेअरस्टाईल, पण...

आहार लक्षात घेऊनच जेवण घ्या

पोटाचा आकार आणि चयापचय दर याच्या आधारावरच शरीराला गरजेची असणारी अन्नाची मागणी व्यक्तीनुसार बदलू शकते. म्हणून आपला आहार लक्षात घेऊनच प्लेटमध्ये जेवणाचे प्रमाण वाढून घ्या. फक्त गरम आणि ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. खूप थंड किंवा दीर्घकाळ ठेवलेली कोणतीही गोष्ट खाणे टाळा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

(Food-News-Immunity-Ayurvedic-diet-Health-News-nad86)

loading image