esakal | उंचीसंदर्भातील 'या' चुकीच्या धारणा तुम्हाला माहिती आहे का?

बोलून बातमी शोधा

height
उंचीसंदर्भातील 'या' चुकीच्या धारणा तुम्हाला माहिती आहे का?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : आपली उंची वाढविण्यासाठी आपण सर्व टॉनिक्स, उपचार, दोरीवरील उड्या आणि इतर गोष्टी करत असतो. या गोष्टी आपल्यासाठी कार्य करतात की नाही हे माहिती नाही. उंची वाढविण्यासाठी अनेक दावे केले जातात. मात्र, ते खरे ठरत नाही हे देखील तितकेच खरे आहे. अनेकांना वाटतं आपली उंची चांगली असावी. त्यासाठी काय करायला पाहिजे? वास्तविक पाहता या विषयासंबंधी अनेक चुकीच्या धारणा आहेत. त्याला कुठलाही आधार किंवा वैज्ञानिक दृष्टीकोम नाही. आज अशाच काही चुकीच्या धारणा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा: ...अन् साडेपाच लाखांचे बिल झाले अडीच लाख, रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा

वाढत्या उंचीबद्दल चुकीच्या धारणा -

उंची आपल्या जीन्सवर अवलंबून असते -

असे मानले जाते की तुमचे जीन्स तुमची उंची निर्धारित करतात आणि जर तुमचे पालक उंच असतील तरच तुम्ही उंच व्हाल. जीन्स आपल्या उंचीमध्ये महत्वाची भूमिका निभावतात हे खरे आहे, परंतु आपल्या उंचीवर परिणाम करणारा हा एकमेव घटक आहे, मानने चुकीचे आहे. जीन्सव्यतिरिक्त निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, योग्य व्यायाम, हार्मोनल बॅलन्स, चांगली झोप यासारख्या इतर गोष्टी देखील आहेत ज्या आपल्या उंचीवर परिणाम करतात.

तारुण्यानंतर तुमची उंची वाढणे थांबते -

कदाचित बहुधा सर्वांनी ऐकलेली ही दंतकथा आहे. याला कुठलाही आधार नाही. खरे म्हणजे तारुण्या आपली वाढ थांबवित नाह, तर वाढ संप्रेरकाचा दर कमी करते. आपल्याकडे तारुण्यानंतर वाढ संप्रेरकाचे पुरेस उत्सर्जन झाल्यास आपण उंच व्हाल. मासिक पाळीनंतरही मुलींची उंची वाढ शकते.

हेही वाचा: भुईमुग लागवडीचा खर्चही पाण्यात, पीक पिवळे पडल्याने शेतकरी संकटात

वजन उचलणे आपली उंची वाढण्यात अडथळा आणू शकते -

व्यायामामुळे शरीर आणि मणक्यावर ताण येतो. मात्र, त्याचा आपल्या उंचीवर कुठलाही परिणाम होत नाही. जास्त वजन उचलल्यामुळे उंचीवर परिणाम होतो, हे चुकीचे आहे. तुम्हाला उंची वाढवायची असेल तर तुम्ही चांगला व्यायाम करणे गरजेचे आहे.

उंचीची शस्त्रक्रिया सुरक्षित आहे -

उंचीच्या शस्त्रक्रियेमध्ये आपल्या हाडांच्या दरम्यान दीर्घकाळ टिकणारी उपकरणे बसविणे आवश्यक असते जेणेकरुन ते अधिक वाढू शकतील. ही शस्त्रक्रिया अत्यंत महाग आहे आणि ती अत्यंत धोकादायक आहे. कृत्रिम रोपण नेहमीच उत्कृष्ट नसते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रक्तवहिन्यासंबंधी आजार, न्यूरोलॉजिकल इजा, स्नायूंच्या आकुंचन, सांधेदुखी आदी समस्या उद्भवू शकतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)