उन्हाळ्यात दररोज Green Salad खा, होतील जबरदस्त फायदे

बहुतेक लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर सॅलड खाणे पसंत करतात.
Green Salad In Summer
Green Salad In Summeresakal
Summary

बहुतेक लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर सॅलड खाणे पसंत करतात.

सॅलड खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतंच, शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात पोटाच्या समस्याही दूर होतात. ग्रीन सॅलड (Green Salad) खाल्ल्याने आरोग्य (Health) तर निरोगी राहतेच शिवाय त्वचा (Skin) आणि केसही (Hairs) निरोगी राहतात. ग्रीन सॅलड कोणत्याही अन्नाची चव वाढवण्याचं काम करते. बहुतेक लोक दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाबरोबर सॅलड खाणे पसंत करतात. ग्रीन सॅलड आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे वजन (Weight) नियंत्रणात राहते. ग्रीन सॅलडमध्ये टोमॅटो, कांदे, कोबी, ब्रोकोली, काकडी अशा विविध गोष्टींचा समावेश असतो.

Green Salad In Summer
उन्हाळ्यात Blood Pressure वाढतंय?आहारात करा 'या' फळांचा समावेश

या सर्व खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.कमी कॅलरीजमुळे त्यामुळे शरीराचं वजन वाढत नाही. आहारात ग्रीन सॅलडचा समावेश करून लठ्ठपणा सहज कमी करता येतो. त्याचबरोबर उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटही ठेवता येतं. चला तर मग उन्हाळ्यात ग्रीन सॅलड खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

ग्रीन सलाड खाण्याचे फायदे...

वजन नियंत्रित राहणे-

वाढलेल्या वजनामुळे (Weight)किंवा लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर उन्हाळ्यात ग्रीन सॅलडचा समावेश नक्की करा. ग्रीन सॅलडमध्ये कॅलरी खूप कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते-

उन्हाळ्यात ग्रीन सॅलड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते (Digestion Process) आणि पोटाचा त्रास कमी होतो. ग्रीन सॅलडमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीर निरोगी ठेवते आणि पचन सुधारते.

Green Salad In Summer
Cucumber For Summer: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने होतात ४ फायदे

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते-

शरीरातील कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात ग्रीन सॅलडचा समावेश अवश्य करावा.ग्रीन सॅलडमध्ये आढळणारे पोषक घटक कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतात. शरीराचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास हृदय निरोगी राहू शकतं.

बद्धकोष्ठता आणि पोटाचा त्रास दूर करतो-

उन्हाळ्याच्या दिवसात, बहुतेक लोक बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांशी संघर्ष करतात. अशात ग्रीन सॅलड खाल्ल्याने या त्रासांपासून सुटका होऊ शकते. ग्रीन सॅलड खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि पोटाच्या समस्या दूर होतात.

Green Salad In Summer
उन्हाळ्यात Acidity होतेय! हे पाच पदार्थ ठरतील फायद्याचे

त्वचा आणि केस निरोगी ठेवणे-

ग्रीन सॅलड खाल्ल्याने आरोग्य तर चांगले राहतेच शिवाय त्वचा आणि केसही निरोगी राहतात. ग्रीन सॅलड खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि केसांची वाढ होते. ग्रीन सॅलडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

शरीराला हायड्रेटेड ठेवा-

ग्रीन सॅलडमध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्या उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवतात. त्यांचे सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही आणि शरीर निरोगी राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com