गाजराचा ज्यूस पिणे आहे खूपच फायदेशीर; अनेक रोगांचा कर्दनकाळ

carrot
carrot

Benefits Of Carrot Juice : आपण सगळेच जण गाजराचा वापर शक्यतो सॅलडमध्येच करतो. त्यानंतर गाजराचा वापर हलवा, बिर्याणी आणि मोमोज् इत्यादी पदार्थांमध्ये देखील गाजराचा वापर केला जातो. मात्र, फार कमी लोक गाजराचा ज्यूस पितात. गाजराचा ज्यूस फक्त स्वादिष्ट्यच नव्हे तर आरोग्यासाठी देखील खूपच लाभदायक असतो. गाजरामध्ये विटामिन ए, सी, के, बी8, आयरन आणि कॉपरसारखे अनेक पोषक तत्त्व असतात. दररोज गाजराचा ज्यूस पिल्याने आपली त्वचा तजेलदार राहते तसेच शरीराचा स्थूलपणा देखील कमी करण्यामध्ये गाजराचा उपयोग होतो. मात्र, दररोज गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत का?

  • वजन कमी करण्यात मदत
  • जे लोक आपल्या स्थूलपणामुळे त्रस्त आहेत, त्यांनी गाजराचा ज्यूस फायदेशीर ठरते. गाजराच्या ज्यूसमध्ये असलेले पौष्टिक घटकांमुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.  
  • शरीरात वाढते हिमोग्लोबिन
  • ज्या लोंकाच्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी गाजराचा ज्यूस प्यायला हवा. गाजराचा ज्यूस पिल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा वाढते. 
  • पचनशक्ती वाढवतो
  • गाजराच्या ज्यूसमध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराची पचनक्रिया अधिक मजबूत होते. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुरळीत राहते. 
  • चेहऱ्यावरील काळ्या डागांना लावतो पळवून
  • गाजराचा ज्यूस दररोज पिल्याने आपली त्वचा तजेलदार राहते. गाजरामध्ये असलेले खनिज पदार्थ आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर मानले जातात. त्यामुळे चेहऱ्यावरील फोड, काळे डाग यांसारख्या समस्या दूर होतात.
  • डोळ्यांसाठी फायदेशीर
  • गाजरामध्ये मोठ्या प्रमाणावर ए विटामिन असल्याकारणाने त्याचा डोळ्यांना फायदा होतोच होतो. गाजराचा ज्यूस पिल्याने डोळ्यांच्या समस्या कायमस्वरुपी दूर होतात. 
  • तोंडाचे आरोग्यासाठी गाजराचा ज्यूस
  • संशोधनात आढळून आले आहे की, गाजराचा ज्यूस पिल्याने हिरड्यांच्या समस्या दूर होतात तसेच आपले दात चमकू लागतात. तोंडाच्या संपूर्ण आरोग्यासाठी गाजराचा ज्यूस पिणे उत्तम मानले जाते. 

सूचना : उपरोक्त लेखात दिल्या गेलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. अधिक माहितीसाठी आपण आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करणेच अधिक फायद्याचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com