esakal | एक उस म्हणजे अनेक आजारांवरील रामबाण उपाय, वाचा जबरदस्त फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

file image

एक ऊस म्हणजे अनेक आजारांवरील रामबाण उपाय, वाचा जबरदस्त फायदे

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नागपूर : उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सर्वांनाच आवडते. तसेच उसाचा रस प्यायल्यानंतर एनर्जेटीक फील येतो. तसेच हा रस शरीरासाठी लाभदायक देखील असते. त्यामुळे उसाच्या रसाचा दैनंदीन आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्ही उसामुळे होणारे काही फायदे सांगणार आहोत.

ओरल हेल्थ मजबूत बनविण्यास मदत -

आपल्यापैकी अनेकजण दातांच्या समस्येने ग्रस्त असतात. हिरड्यांवर सूजन येणे, दाढ दुखणे असे अनेक आजार असतात. दात हे शरीरातील मजबूत भाग आहेत. त्यामुळे अशा समस्या उद्भवू नये. नियमित दात घासण्यासोबतच श्वासमधून दुर्गंधी येत असेल तर उस त्यावर फायदेशीर आहे.

पचनशक्ती सुधारण्यास मदत -

आपल्या धावपळीच्या जीवनात आपण अधिक कॅलरीजवाले फूड्स घेतो. त्यामुळे फॅट वाढते. त्यामुळे पचनसंस्थेवर देखील परिणाम होतो. त्यासाठी आपल्या आहारात उसासारखे घटकांचा समावेश करा. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.

हेही वाचा - हुर्रे..! परीक्षा न देताच पास, पण खासगी शाळांकडून शुल्कासाठी परीक्षेचं निमित्त

वजन कमी करण्यास मदत -

जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्याचे सेवन केल्याने वजन वाढते. त्यात उसाच्या रस्चाे सेवन केल्यास सर्व पदार्थ बाहेर पडतात. तसेच शरीराला आयरन, मॅग्नेशिअम, जस्त, थियामिन इत्यादी पोषक तत्व मिळतात.

नखांचे आरोग्य चांगले राहते -

अधिक काळासाठी उपचार घेतल्यास नखांची चमक नष्ट होते. त्यासाठी नेलपॉलिश लावून नखांना कोट करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. मात्र, काही दिवसानंतर नखे कमजोर होतात. त्यामुळे आपल्या नखांची काळजी घेण्यासाठी उसाच्या रसाचे सेवन करा. त्यात कॅल्शियम आणि अन्य महत्वपूर्ण पोषक तत्वांचा समावेश असतो.

हेही वाचा - मैत्रिणीला फिरायला घेऊन जाणं पडलं महाग, तब्बल ६ लाखांचा गंडा

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत -

उसाच्या रसामध्ये आवश्यक सामग्री टाकून प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच ऋतूनुसार होणारे आजार देखील कमी होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)