esakal | कंबर, पाठदुखीने त्रस्त आहात? मग, 'या' सोप्या टिप्स जरुर आजमावा I Back Pain
sakal

बोलून बातमी शोधा

Back Pain
आधुनिक काळात निरोगी राहणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही.

कंबर, पाठदुखीने त्रस्त आहात? मग, 'या' सोप्या टिप्स जरुर आजमावा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

'पाठदुखी' ही एक सामान्य समस्या आहे. हा त्रास कोणालाही होऊ शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या (National Institutes of Health) मते, 80 टक्के लोकांना आयुष्यात एकदा तरी पाठदुखीचा त्रास जाणवतो. कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेसह बसण्याचा चुकीचा मार्ग निवडल्यामुळं पाठदुखीची समस्या उद्भवू शकते. विशेषत: बऱ्याच वेळा एकाच जागेवर बसल्यामुळं मणक्याला त्रास होतो. यामुळे पाठदुखीची समस्या निर्माण होते. तसेच स्त्रियांमध्ये पाठदुखीची तक्रार मासिक पाळीदरम्यान अडथळा निर्माण करते. पाठदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लोक डाॅक्टरांसह विविध घरगुती उपाय करताना दिसतात. जर तुम्ही देखील पाठदुखीने त्रस्त असाल आणि त्यापासून मुक्त व्हायचं असेल, तर या टिप्स नक्की पाळा..

योग्य स्थितीत बसा : सध्या कोराना काळात अनेक जण 'वर्क फ्राॅम होम' काम करताना दिसत आहेत. या दरम्यान, लॅपटॉप आणि पीसीजवळ बसून तासनतास काम करावं लागतंय. अशा स्थितीत एकाच जागी बसण्यामुळं आपल्याला कंबरदुखीचा त्रास जाणवतो. यामुळं पाठीच्या कण्यावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे पाठदुखीची तक्रार जाणवते. यासाठी योग्य आसनात बसा आणि पाठीचा कणा सरळ ठेवा.

व्यायाम करा : आधुनिक काळात निरोगी राहणं हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. तंदुरुस्त राहण्यासाठी डॉक्टर दररोज वर्कआउट करण्याची शिफारस करतात. जर तुम्हाला वर्कआउट करता येत नसेल, तर मॉर्निंग वॉक नक्की करा (सकाळी फिरायला जा). जेणे करुन पाठदुखीपासून मुक्त होण्यास मदत होते.

हेही वाचा: पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

मालिशचा अवलंब करा : प्राचीन काळी लोक निरोगी राहण्यासाठी मालिशचा अवलंब करायचे. आधुनिक काळातही आपल्याला जेव्हा वेदना होतात, तेव्हा मालिश करण्याचा सल्ला आजी आपल्याला देत असते. यासाठी मोहरीचं तेल वापरलं जाऊ शकतं. विशेषतः आंघोळ करण्यापूर्वी मालिश केल्यानं खूप फरक पडतो. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ कोमट पाण्यानंच आंघोळ करा.

हेही वाचा: चालण्याच्या व्यायामाने कमी होईल वजन; 'हे' शेड्युल करा फॉलो

नीलगिरीच्या तेलानं स्नान करा : जर तुम्हाला पाठदुखीनं त्रास होत असेल आणि त्यापासून मुक्त व्हायचं असेल, तर निलगिरी तेल वापरा. यासाठी एक बादली कोमट पाणी घ्या आणि त्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर आंघोळ करा. असे केल्याने पाठदुखीसह इतर अनेक वेदनांपासून आपल्याला आराम मिळेल.

टीप : या लेखात प्रकाशित केलेली माहिती सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. 'ई-सकाळ' याला दुजोरा देत नाही. म्हणून, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

loading image
go to top