esakal | Health Tips - चालण्याच्या व्यायामाने कमी होईल वजन; 'हे' शेड्युल करा फॉलो
sakal

बोलून बातमी शोधा

weight loss

एका संशोधनानुसार ३३ मिनीटे चालण्याणे ५०० कॅलरी बर्न होतात.

चालण्याच्या व्यायामाने कमी होईल वजन; 'हे' शेड्युल करा फॉलो

sakal_logo
By
टीम ई सकाळ

धावपळीच्या या शेड्युलमध्ये फीटनेसची काळजी घेणे सोपे नाही. वारंवार कंप्युटरसमोर बसणे, ड्रायविंग करुन घरी येणे. या सर्वानंतर व्यायामासाठी वेळ मिळत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. यावेळी फक्त आराम करावा असे वाटते. यामुळे वजन वाढण्याच्या समस्या उद्भवतात. यामुळे ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजार वाढू शकतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे आणि वजन वाढू न देणे महत्वाचे आहे. एका संशोधनानुसार ३३ मिनीटे चालण्याणे ५०० कॅलरी बर्न होतात. यामुळे एका महिन्यात तुमचे १ किलो वजन घटू शकते.

हेही वाचा: वयाच्या 80 व्या वर्षी अमिताभ एवढे उत्साही कसे, जाणून घ्या कारणं

कसे होईल महिन्यात एक किलो वजन कमी

एका रिपोर्टनुसार जर तुम्ही चालण्याचा व्यायाम करणार असाल तर, वेगावे चाला. यामुळे वजनही गतीने घटते. प्रत्येक व्यक्तिची वॉकिंग स्पीड वेगवेगळे असते. परंतु जलद किंवा वेगाने चालणे करावे. जर तु्म्ही दरदिवसाला ३३ मिनीटे चालणे ठेवले तर तुमच्या ५०० कॅलरी बर्न होतात. या शेड्युलमुळे एका महिन्यात जवळपास १ किलो वजन घटू शकते.

हेही वाचा: पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

बनवा ३३ मिनीटांचे वॉक शेड्युल

  • १० मिनीटे नॉर्मल स्टेप आणि वॉर्मअप

  • २ मिनीटे ६-८ च्या वेगाने चालणे

  • ४ मिनीटे असे चालणे ज्यामुळे श्‍वासोच्‍छवास गतीने होईल

  • ३ मिनीटे वेगाने चालणे

  • ३ मिनीटे फक्त वेगाने चालणे यामध्ये तुम्ही बोलू शकाल असे स्पीड ठेवा

  • ४ मिनीटे पुन्हा वेगाने चालणे

  • ५ मिनीटे स्वत:ला नॉर्मल करा

loading image
go to top