Health News: काही लोकांसाठी विषाप्रमाणे आहे सोयाबीन; जाणून घ्या नुकसान

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 11 February 2021

सोयाबीन निश्चितच प्रोटीनचा एक मुख्य आणि प्रमुख स्रोत आहे, पण सोयाबीनचे जास्त सेवन आरोग्यसाठी हानीकारण ठरु शकते.

Health News: सोयाबीन खाणे अनेक लोकांना आवडते. सोयाबीन प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे. सोयाबीन असा पदार्थ आहे ज्याला भात किंवा रोटी-चपातीसोबत खाल्ले जाऊ शकते. अनेक लोक याला नाष्टा म्हणूनही खाणे पसंद करतात. सोयाबीन निश्चितच प्रोटीनचा एक मुख्य आणि प्रमुख स्रोत आहे, पण सोयाबीनचे जास्त सेवन आरोग्यसाठी हानीकारण ठरु शकते. त्यामुळे काही लोकांनी सोयाबीनपासून दूर राहिलेलं बरं.

तुमचा लाइफ पार्टनर वजन कमी करतोय? तर 'या' ४ सोप्या पद्धतीनं करा...
सोयाबीनचे नुकसान पुढील प्रमाणे-

- सोयाबीन खाण्याचा मुख्य धोका म्हणजे याच्या जास्तीच्या सेवनामुळे अॅलर्जीची समस्या जाणवू शकते. त्यामुळे सोयाबीन खाल्यानंतर अॅलर्जी जाणवत असल्यास याचे सेवन बंद करा.

- सोयाबीन खाल्याने महिलांमध्ये हॉर्मोनसंबंधी अनेक समस्या जाणवू शकतात. सोयाबीनमध्ये असलेले कम्पाऊंट फीमेल हॉर्मोन अॅस्ट्रोजनची नकल करतात. त्यामुळे महिलांनी याचे अधिक प्रमाणात सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. 

- मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे सेवन केल्यामुळे पुरुषांमधील स्पर्मच्या संख्येमध्ये कमतरता येते. त्यामुळे मर्यादीत प्रमाणात सोयाबीन खाण्याचा सल्ला दिला जातो. 

पुरूषांनी दररोज मूठभर तरी मखाने खाल्ले पाहिजे, जाणून घ्या जबरदस्त फायदे

- सोयाबीनमध्ये असलेले ट्रान्स फॅट लठ्ठपणा वाढवते. तसेच यामुळे कॉलेस्ट्रालही वाढते. 

-हृदयासंबंधी काही आजार असल्यास चुकुनही सोयाबीन खाऊ नका. हृद्यासंबंधी आजार असलेल्या लोकांना सोयाबीन न खाण्याचा सल्ला दिला जातो. 

-याशिवाय ज्या लोकांमध्ये मायग्रेनची समस्या आहे, तसेच ज्यांना शरीर फुगणारा थायरॉईड आहे अशांनी सोयाबीन खाऊ नये. अशाप्रकारचा आजार असलेल्या लोकांना सोयाबीनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. 

(टीप- ही बातमी रिचर्स आणि मान्यतेवर आधारित लिहिण्यात आली आहे. कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या) भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health tips News soybean side effects warning