महिला झाली HIV मुक्त; वाचा काय केले उपाय?| HIV Treatment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hiv
महिला झाली HIV मुक्त; वाचा काय केले उपाय?| HIV Treatment

महिला झाली HIV मुक्त; वाचा काय केले उपाय?

एचआयव्ही हा असा आजार आहे ज्यावर तो पूर्ण बरा होण्यासाठी अजूनही योग्य उपाय मिळालेले नाहीत. पण, वर्षानुवर्षे यावर योग्य उपचार शोधत असलेले शास्त्रज्ञ आता त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या (America) शास्त्रज्ञांनी एचआयव्हीचा (HIV) तिसरा रुग्ण आणि पहिल्या महिलेवर (Women) नव्या तंत्रज्ञानाने उपचार केले आहेत. डेन्वर येथील संशोधकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या अहवालानुसार वैज्ञानिकांनी स्टेम सेल ट्रान्सप्लांट (Stem Cell Transplant) तंत्रज्ञानाद्वारे ही करामत केली आहे. एचआयव्हीपासून बरी होणारी ती जगातील पहिली महिला आहे. आता या तंत्रज्ञानामुळे एचआयव्ही रुग्णांच्या उपचारात (Treatment) मोठी मदत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉन नंतर 'डेल्टाक्रॉन' वाढवणार चिंता? वाचा काय म्हणाले शास्त्रज्ञ

नवीन तंत्रज्ञान कसे आहे?

अमेरिकेतल्या एचआयव्ही ग्रस्त महिलेवर नव्या पद्धतीने उपचार केले गेले. यात गर्भनाळेच्या  (Umbilical Cord ) रक्ताचा उपयोग केला गेला. अस्थिमज्जा प्रत्यारोपणात ज्याप्रमाणे तंत्र वापरले जाते तसेच याआधारे नाभीसंबधीचा कॉर्ड स्टेम पेशी दात्यासोबत मिसळण्याची गरज नाही. एचआयव्ही रूग्णांसाठी bone marrow transplant चा पर्याय फारसा चांगला नाही कारण असं करणं धोकादायक असु शकतं. त्यामुळे कॅंसरमुळे त्रस्त असणाऱ्या याचे उपचार केले जातात तसेच त्यांना दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसतो. जगभरात आतापर्यंत एचआयव्हीच्या दोनच अश्या केसेस होत्या ज्यांच्यावर यशस्वी उपचार झाले. द बर्निल पेशंट या नावाने ओळख असणारे टिमोथी रे ब्राऊन हे विषाणूपासून १२ वर्ष मुक्त होते. त्याचे २०२० साली कर्करोगाने निधन झाले. तर, २०१९ मध्ये एचआयव्ही ग्रस्त अॅडम कॅस्टिलेजो यांच्यावरचे उपचार यशस्वी ठरले.

हेही वाचा: महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

HIV

HIV

त्या दोघांवरही डोनरच्या माध्यमातून बोन मॅरो टान्सप्लांट करण्यात आले. दात्यामध्ये अशा प्रकारचे उत्परिवर्तन आढळून आले की, ज्यामुळे एचआयव्ही संसर्ग टाळता येऊ शकेल. अशा प्रकारचे दुर्मिळ उत्परिवर्तन फक्त २०,००० देणगीदारांमध्ये आढळले असून त्यापैकी बरेचजण उत्तर युरोपमधील आहेत. रुग्णांवर उपचार करणाऱ्या टीममधील डॉ. कोएन व्हॅन बसियन याविषयी म्हणाले की, स्टेम सेलच्या नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांना खूप मदत होणार आहे. नाळेच्या रक्तातील अंशत: जुळणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे अशा रुग्णांसाठी योग्य दाता शोधण्याची शक्यता खूप पटीने वाढते.

हेही वाचा: व्यायामाच्या आधी अन् नंतर किती प्रमाणात पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत

महिलेला होत्या अनेक समस्या

२०१३ साली महिलेला एचआयव्ही असल्याचे समजले. चार वर्षांनंतर तिला ल्युकेमिया असल्याचेही उघड झाले. या रक्ताच्या कर्करोगावर हॅप्लो-कॉर्ड ट्रान्सप्लान्टद्वारे उपचार केले गेले. ज्यामध्ये अंशत: अर्धवट जुळलेल्या दात्याकडून कॉर्ड रक्त घेण्यात आले. ट्रान्सप्लॅंटच्या दरम्यान जवळच्या नातेवाईकानेही रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रक्त दिले. तिचे शेवटचे ट्रान्सप्लांट २०१७ साली झाले. आता तिचा ल्युकेमिया पूर्णपणे बरा झाला आहे. ट्रान्सप्लान्टच्या तीन वर्षानंतर, डॉक्टरांनी तिचे एचआयव्ही उपचार बंद केले आहेत. या महिलेला आतापर्यंत कोणत्याही विषाणूचा (Virous) सामना करावा लागलेला नाही.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील एड्स तज्ज्ञ डॉ. स्टीव्हन डिक्स यांच्या मते, या महिलेचे आई-वडील वेगवेगळ्या रंगाचे(काळे-गोरे) होते. मिश्र वंश आणि स्त्री असणे हे हे दोन्ही घटक वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत, डिक्स म्हणाले, गर्भनाळ खूप प्रभाव पाडते. या पेशी आणि कॉर्ड ब्लडमध्ये असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीमुळे रुग्णांना फायदा होतो.

Web Title: Hiv Women Patients Treatment With New Technology Get New Life American Experts Claim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..