esakal | घरगुती उपाय करा, अ‍ॅसिडीटी पळवा! | health tips
sakal

बोलून बातमी शोधा

Acidity

Health Tips : घरगुती उपाय करा, अ‍ॅसिडीटी पळवा!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना आता लोकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. तसेच रूग्णांचे प्रमाणही कमी झाल्याने दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. दिड वर्षांपूर्वी जशी आपली लाइफस्टाइल होती. तशी अनेकांची पुन्हा सुरू झाल्याने धावपळ वाढली आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी येणारा स्ट्रेस आहेच. पण वेळी अवेळी जेवण, झोप पुर्ण न होणे या समस्याही भेडसावत आहेत. परिणामी पित्त वाढते आहे. त्यामुळे डोकेदुखी, चिडचिडही वाढते आहे. मात्र वाढणारे पित्त काही घरगुती उपाय करून कमी करता येईल.

आपल्या रोजच्या जेवणात आपण ज्या मसाल्यांचा उपयोग करतो त्याचेच योग्य प्रमाणात सेवन केल्यास पित्त कमी होण्यास मदत मिळू शकते.

ओवा

ओवा हा सर्वांच्याच घरी अ्सतो. पाण्यत एक ते दीड चमचे ओवा घालून ते पाणी उकळवायचे. थोडे थंड झाल्यावर ते गाळून पिता येईल किंवा ओव्यासह तुम्ही ते पिऊ शकता. पित्तामुळे येणारी करपट ढेकर, पोटदुखी, थकवा हे पाणी प्यायल्यामुळे कमी होईल.

हेही वाचा: चित्रपटात शारीरिक संबंधांची सुरुवात 'किसींग'ने का होते?

जीरं

रोजचा स्वयंपाक करताना फोडणीत वापरला जाणारा घटक म्हणजे जीरं. जीरं खमंग भाजून त्याची पावडर करून घ्यायची. ती पावडर गरम पाण्यात सैधव मिठासोबत एकत्र करून प्यायची. हे पाणी प्यायल्यामुळे अपचनाची समस्या दूर होते.

हिंग

हिगांचा वापर रोजच्या जेवणात हमखास केला जातो. जर पोट जड झाले असेल तर थोडा हिंग गरम पाण्याबरोबर खाता येतो. तसेच ताकात हिंग, काळे मीठ एकत्र करून रोज प्यायल्यानेही अपचन, पित्त कमी होण्यास मदत होते.

दालचिनी

कधीतरी छोले, राजमा, पुलाव, बिरयानी आदी पदार्थ करताना दालचिनीचा वापर हमखास केला जातो, दालचिनी पावडरच्या सेवनाने पित्तामुळे होणारी पोटदुखी कमी होण्यास मदत होते.

loading image
go to top