सॅनिटायझर वापरत असाल तर, सावधान; गंभीर आजार उद्भवू शकतात!

how to use hand sanitizer covid 19 pandemic
how to use hand sanitizer covid 19 pandemic
Updated on

मागील काही महिन्यांपासून कोरोनामुळे प्रत्येकाचे आयुष्य बदललेले आहे. या काळात आपला एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी तुम्ही 'कोरोना' हा शब्द ऐकला नसेल. रोजचे वाढणारे कोरोनाचे रुग्ण यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतलीच पाहिजे. आपण कामाशिवाय बाहेर पडू नका, बाहेर जाताना मास्कचा नियमित वापर करा आणि हॅंड सॅनिटायझरने हात धुवा, अशा बऱ्याच सूचना प्रत्येक ठिकाणी ऐकत आणि पाहत आला आहात. या काळात हॅंड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच याकाळात कोणत्या हॅंड सॅनिटायझरचा वापर नेमका कसा करायचा ते बऱ्याच जणांना माहीत नाहीये. बरेच जण याचा चुकीच्या पध्दतीने वापर करतात. आज आपण या लेखात कोणता हॅंड सॅनिटायझरचा वापरायचा आणि तो नेमका कसा वापर करायचा ते जाणून घेणार आहोत.

आरोग्य विषयक बातम्या वाचण्यासाठी यथे क्लिक करा

सध्या सॅनिटायझरचा वापर आणि त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बरेच नकली हॅंड सॅनिटायझर बाजारात मिळत आहेत. अशा सॅनिटायझरच्या वापरामुळे आपल्या त्वचेवर गंभीर परिणाम दिसून येतात. याबद्दल US Food and Drug Administration (FDA)ने मिथेनॉल (methanol) आणि वूड अल्कोहोल (wood alcohol)हे घटक ज्या सॅनिटायझरमध्ये आहे त्यांचा वापर टाळावा असं सांगितलं आहे. हे घटक असणारे सॅनिटायझर आपल्या त्वचेवर दुष्परिणाम करतात, तसेच याचा आपल्या डोळ्याशी संबंध आला तर, यामुळे आपल्याला अंधत्व येऊ शकते. यामुळे असे सॅनिटायझर वापरू नये असं FDA ने सांगितले आहे. भारत सरकारनेही याबद्दल कडक नियमावली करुन बाजारातील नकली सॅनिटायझरवर चाप बसवला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोणती सॅनीटायझर वापरावी याबद्दल माहिती दिलेलीच आहे. त्यामध्ये दोन प्रकारच्या रासायनिक घटकांचे समिश्रे असणारी सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये ethanol 80% (v/v), glycerol 1.45 (v/v), आणि  hydrogen peroxide 0.125 % (v/v) हे एक समिश्र आणि isopropyl alcohol 75% (v/v), glycerol 1.45 (v/v), hydrogen peroxide 0.125 % (v/v) आहे. या घटकांचा सामावेश असलेले सॅनिटायझर वापरण्यास सांगितले आहे. 

योग्य प्रमाणात वापर करा
हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. किमान 20 सेकंद हातांना सॅनिटायझर लावून चोळावे. दोन्ही तळहात, बोटांमधील जागा, हातांची मागील बाजू सर्व सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्यावी. कोरोनाकाळात जरी सॅनिटायझरचा उपयोग करत असाल तर ते चांगलेच पण त्याचा उपयोग प्रमाणात केला पाहिजे. जास्तीचा उपयोग केल्याने त्वचा कोरडी पडू शकते. निटायझरच्या अतिवापरामुळे इतरही दुष्परिणाम भागावे लागू शकतात. त्यामुळे इथून पुढे योग्य सॅनिटायझर योग्य पद्धतीने प्रमाणात वापरावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com