मानवाच्या लाळेमध्ये आढळले पेनकिलर, मॉर्फिनपेक्षाही असते सहापट प्रभावी

भाग्यश्री राऊत
Monday, 16 November 2020

ऑपिऑर्फिन हे एनकेफालिन्स हे रसायनाची साखळी तोडून दुख कमी करण्याचे काम करते. त्यामुळे तयार झालेले ऑपीएट रिसेप्टर मेंदूकडे जाणारे वेदनेचे संकेत थांबविण्यास मदत करते. ऑपिऑर्पिन हे नवीन पिढीतील प्रभावी पेनकिलर ठरू शकते.

नागपूर : ओपिऑर्फिन हे नवीन पेनकिलर असून ते मानवी शरीरात आढळते. सर्वसाधारणपणे ते मानवाच्या लाळेमध्ये आढळते. उंदीर आणि मानवी लाळेवर प्रयोग केला असता हे द्रव्य मॉर्फिनपेक्षाही सहापट जास्त प्रभावी असल्याचे आढळून आले. या नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या पेनकिलरमुळे अनेक साईड इफेक्ट टाळण्यास मदत होते. मात्र, हे दूर्मिळ आहे. याचा वापर कदाचित उपचार म्हणूनही केला जाऊ शकतो. मात्र, त्याची अद्याप ड्रग्स चाचणी झालेली नाही. 

हेही वाचा - 'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?

ऑपिऑर्फिन हे एनकेफालिन्स या रसायनाची साखळी तोडून वेदना कमी करण्याचे काम करते. त्यामुळे तयार झालेले ऑपीएट रिसेप्टर मेंदूकडे जाणारे वेदनेचे संकेत थांबविण्यास मदत करते. ऑपिऑर्पिन हे नवीन पिढीतील प्रभावी पेनकिलर ठरू शकते. मॉर्फिनचे सेवन केल्यास त्याची सवय लागण्याची शक्यता असते. मात्र, ऑपिऑर्फिनची कुठलीही सवय लागत नाही. तसेच मानसिकरित्या कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. जेव्हा संशोधकांनी उंदारांना ऑपिऑर्फिन दिले. त्यावेळी मार्फिनपेक्षा ऑपिऑर्फिन जास्त प्रभावी असल्याचे आढळून आले. उंदाराच्या त्याच वेदन जेव्हा मॉर्फिन देऊन कमी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मॉर्फिनचे सहा डोस द्यावे लागले. मात्र, याची अद्याप प्रभावी ड्रग्स म्हणून चाचणी होणे बाकी आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे ड्रग्स नसून एक अँटी-डिप्रेसिव्ह मॉलिकुल देखील असू शकते. ऑफिऑर्फिन हे मज्जातंतूच्या पेशींमध्ये काम करते. त्याठिकाणी एनकेफालिन्स या रसायनाची साखळी तोडण्याचे काम करते. 

हेही वाचा - Motivation Story : सुहासने लावला ‘सेफ फूड वॉश’ लिक्विडचा शोध; भाज्या होणार...

ओपिऑर्फिन हा एक साधा रेणू असून  त्यास लाळेपासून वेगळे न करता त्याचे संश्लेषण करणे आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य असल्याचेही शास्त्रज्ञ सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: human saliva contains painkiller opioprphin

Tags
टॉपिकस
Topic Tags: