Motivation Story : सुहासने लावला ‘सेफ फूड वॉश’ लिक्विडचा शोध; भाज्या होणार विषाणूमुक्त!

राजेश रामपूरकर
Sunday, 15 November 2020

रासायनिक कीटकनाशके मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी करतात, हे वाचले होते. महामारीच्या काळात ते वाढविण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू होती. टाळेबंदीच्या काळात सलग दोन महिने विविध प्रयोग करून सुहास बुधे यांनी उत्पादन पुढे आणले.

नागपूर : देशात काही वर्षांत स्टार्टअप संस्कृती मुळ धरू लागली आहे. त्यामध्ये युवकांचा कल अधिक प्रमाणात दिसून येतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसायाची अनोखी संकल्पना आणि उत्तम ताळमेळ साधत देशात विविध क्षेत्रांमध्ये स्टार्टअप सुरू होत आहेत. आपल्या मातीतील लोकांसाठी काम करणाऱ्या स्टार्टअपन्सना अधिक मागणी असून चांगला प्रतिसादही मिळतो आहे. त्यातील एक आघाडीचे आणि ग्राहकांच्या आरोग्यासाठी उत्तम करून नावलौकिक मिळवेलेले नाव म्हणजे सुहास बुधे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाजीपाला, फळे धुण्यासाठी व्हिनेगर, मीठ, कॉस्टिक सोडा तर काही जण साबणाचा व गरम पाण्याचा वापर करीत होते. त्यामुळे कोरोना विषाणू धुतला जात असला तरी त्याचे अस्तित्व संपुष्टात येत नव्हते. हे पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याने पर्यावरणपूरक, आरोग्याची काळजी घेणाऱ्या शंभर टक्के सेंद्रिय ‘सेफ फूड वॉश’ लिक्विडचा शोध लावून ‘बायोझॅप’ हे स्टार्टअप सुरू केले.

अधिक माहितीसाठी - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

कृषी उत्पादनावरील रासायनिक कीटकनाशके धुण्यासाठी सेंद्रिय द्रव्याचा वापर केला जात होता. कोरोना महामारीच्या काळात घरोघरी भाजी धुण्यासाठी पारंपरिक पद्धतीच्या वापरावर भर होता. माहितीचे स्रोतही व्हॉट्सॲप अथवा इतर सोशल मीडियाच होता.

त्यातून ते याचा वापर करीत असे. मात्र, यामुळे किती प्रमाणात भाज्या व फळे निर्जंतुक होत आहेत, याचा काहीही ठोस पुरावा नव्हता. यातूनच बायोझॅप हे अशा प्रकारचे अन्न निर्जंतुकीकरण करणाऱ्या द्रव्याची संकल्पना पुढे आली.

त्यामुळे केवळ भाजीपाला, फळे स्वच्छ आणि निर्जंतुक होत नाही, तर त्यांचा ताजेपणा कायम ठेवण्याबरोबरच पोषण द्रव्येही कायम राहतात. हे द्रव्य वापरणेही अतिशय सुलभ आहे. रासायनिक कीटकनाशके काढल्यानंतर सर्वच उत्पादने सेंद्रिय करता येत नसली तरी यामुळे त्यावरील रासायनिक कीटकनाशके धुतली जातात.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

रासायनिक कीटकनाशके मानवाची रोगप्रतिकारशक्ती कमी करतात, हे वाचले होते. महामारीच्या काळात ते वाढविण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू होती. टाळेबंदीच्या काळात सलग दोन महिने विविध प्रयोग करून सुहास बुधे यांनी उत्पादन पुढे आणले.

हे उत्पादन ई-कॉमर्स पोर्टलच्या मदतीने दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, पुणे, भोपाळ, उत्तराखंड, सिक्किम, हिमाचल प्रदेश आदी भागात हे उत्पादन पोहोचविण्यात येत आहे. अतिशय अल्पावधीतच या उत्पादनाला देशभरातून चांगली मागणी आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disinfect vegetables with organic matter