शरीरात व्हिटॅमिन A ची कमतरता असेल तर करा या पदार्थांचा आहारात समावेश

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 6 October 2020

व्हिटॅमिन 'ए' हे रोगप्रतिकारक क्षमता चांगली करण्यासाठी लागणाऱ्या व्हिटॅमिनपैकी एक आहे. जर तुमच्या शरीरात पुरेसे व्हिटॅमिन ए असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मोठी मदत होऊ शकते आणि तुम्ही नेहमी तंदूरुस्त राहू शकता.

पुणे: व्हिटॅमिन 'ए' हे रोगप्रतिकारक क्षमता चांगली करण्यासाठी लागणाऱ्या व्हिटॅमिनपैकी एक आहे. जर तुमच्या शरीरात पुरेसे व्हिटॅमिन ए असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मोठी मदत होऊ शकते आणि तुम्ही नेहमी तंदूरुस्त राहू शकता. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एचं प्रमाण कमी असेल तर तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम दिसतो. 

एका संशोधनात असे दिसून आले आहे की, व्हिटॅमिन एची कमतरता असलेल्या लोकांच्या हाडांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते. हाडे मजबूत राहण्यासाठी आपल्या शरीराला कॅल्शियमसोबत व्हिटॅमिनचीही मोठी गरज भासत असते. असंही मानलं जातं की, आपल्या शरीरात व्हिटॅमिन एचं प्रमाण चांगलं असेल तर कॅन्सर होण्याची शक्यताही कमी असते. त्यामुळे ज्या आहारातून किंवा पदार्थांतून आपल्याला बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए मिळतं त्यांचा सामावेश आपल्या आहारात केला पाहिजे.  

हेही वाचा - तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते ब्रम्हकमळ : खोकला, सर्दी, कॅन्सरवर आहे गुणकारी

आपल्या शरीरातील व्हिटॅमिन एचं प्रमाण वाढवायचं असेल तर खालील पदार्थांचा आणि फळांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे- 

1. मांस
2. मासे
3. अंडी
4. गाजर
5. टोमॅटो
6. दूध
7. पालक
८. चाकवत
9. ऍपल
10. द्राक्षे
11. संत्री
12. पालेभाज्या 
१३. किवी
14. ब्रोकोली
15. ऍव्होकॅडो
16. बदाम
17. अक्रोड

हेही वाचा - पोटाच्या विकारांपासून तर वजन कमी करण्यापर्यंत फायदेशीर बुरशीजन्य पदार्थ

वरील दिलेली फळे, भाज्या आणि पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील व्हिटॅमिन एचं प्रमाण वाढू शकतं. शरीरातील व्हिटॅमिन एचं प्रमाण वाढले तर रोगप्रतिकारक क्षमता वाढून चांगलं निरोगी राहता येईलं. 

(Disclaimer: हा मजकूर फक्त सल्ल्यासह सर्वसाधारण माहिती प्रदान करतो. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to increase vitamin a in body should eat these foods