हेअर ट्रिटमेंट घेताना घ्या काळजी, चुकीची उत्पादने वापरल्यास गंभीर आजाराची शक्यता

 hair treatment
hair treatment e sakal

नवी दिल्ली : दिल्लीतील सॅलॉनने एका महिलेचे केस चुकीच्या पद्धतीने कापले होते. तसेच केसांसाठी चुकीची उपचारपद्धती वापरली होती. त्यामुळे त्या महिलेचे दाट केस पूर्ण गळाले होते. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या मदतीने महिलेला २ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. मात्र, आपण ज्यावेळी सॅलॉनमध्ये हेअर ट्रीटमेंट (hair treatment) घेतो त्यावेळी कुठली काळजी घ्यायची हे तुम्हाला माहिती आहे का? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 hair treatment
हेअर ट्रान्सप्लांट नंतर तीन दिवसांनी ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुरुषांच्या तुलनेत महिला या केसांना अधिक जपतात. केसांमुळे महिलांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्यामुळे केसगळती सुरू होताच महिला नानाविध उपाय करतात. अनेकजण केसांवर निरनिराळे प्रयोग देखील करत असतात. तुम्ही देखील केसांसाठी ट्रिटमेंट घ्यायला सॅलॉनमध्ये जायचा विचार करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

केशरचनेसासाठी वापरली जाणारी उत्पादने हे पूर्वीच्या काळापासून उपलब्ध आहेत. त्याचा वापर केसांचा आकार किंवा एखादी विशिष्ट केशरचना करण्यासाठी केला जातो. मात्र, काळानुसार या हेअर स्टाईलींग प्रॉडक्ट्समध्ये बदल होत गेले. आता यामध्ये हेअर स्प्रे, स्टाईलिंग जेल, हेअर मूस, पोमेड्स आणि हेअर कलरिंग एजंट्ससह अनेक उत्पादनांचा समावेश होतो. मेण, पेट्रोलेटम, लॅनोलिन, वनस्पती तेल, खनिज तेल, सिलिकॉन, सुगंधी हायड्रोकार्बन या घटकांचा वापर करून हेअर स्टाईलिंग प्रॉडक्ट बनविले जातात. यामध्ये सूर्यप्रकाशापासून केसांचं संरक्षण करणाऱ्या काही घटकांचा देखील समावेश असतो, असे मुंबईतील भाटीया रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सौरभ शाह यांनी 'इंडियन एक्सप्रेस'सोबत बोलताना सांगितले.

केसांना रंग देण्यासाठी वापरणाऱ्या उत्पादनांमध्ये त्वचेला इजा पोहोचविणाऱ्या अनेक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे अॅलर्जी देखील होऊ शकते. त्यामुळे कुठलीही हेअर ट्रीटमेंट घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. केसांसाठी कुठलाही उपचार घेताना आपल्या टाळूची त्वचा तपासणे महत्वाचे आहे. कोणाला केस गळतीची समस्या असेल तर त्यांनी स्मूथनिंग करू नये. कोणाच्या टाळूची त्वचा संवेदनशील असेल तर झिरो सल्फेट, पॅरबीन नसलेला शाम्पू वापरावा, असेही डॉ. शाह म्हणाले.

टाळूच्या त्वचारोगाचे अनेक प्रकार असतात. यामध्ये त्वचा लाल येणे, खाज येणे, खवले तयार होणे आणि टाळू जळजळ करणे. तसेच चीडचीड होणे, लालसरपणा जाणवणे, सतत खाज सुटणे, अशा अनेक त्वचारोगांचा समावेश असतो. 'अॅनाफिलॅक्सिस' हा टाळूशी संबंधित सर्वात भयंकर त्वचारोग आहे. केसांचा एखाद्या विशिष्ट प्रॉडक्टसोबत संपर्क आल्यास हा त्वचारोग होतो. यामध्ये त्वचेवर लाल धब्बे, मळमळ होणे, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसतात, असेही डॉ. शाह यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com