हृदयाचा सच्चा दोस्त लसूण; अंकूरलेल्या लसणाचे आहेत खूप सारे फायदे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

अंकूर आलेल्या लसणामध्ये एँटी-ऑक्सिडंटचे वैशिष्ट्य मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. हे आपल्या शरिरासाठी किती फायदेशीर आहे, चला जाणून घेऊयात...

पुणे : तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या लोकांकडून लसणाच्या फायद्यांबाबत अनेकदा ऐकलं असेल. भारतीय पदार्थांमध्ये लसूण या घटकाचा वापर सर्रास केला जातो. भाजी असो वा लोणचं... जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी तसेच आपल्या शरिराला आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसूण खुपच प्रभावी मानला जातो. मात्र, तुम्ही क्वचितच अंकूर आलेल्या लसणाबाबत ऐकलं असेल. तसेच याचे फायदे देखील आपण क्वचितच ऐकले असतील. जर आपल्याला अंकूर आलेल्या लसणाबाबत फायदे माहित नसतील. तर हा लेख आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. अंकूर आलेल्या लसणामध्ये एँटी-ऑक्सिडंटचे वैशिष्ट्य मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. हे आपल्या शरिरासाठी किती फायदेशीर आहे, चला जाणून घेऊयात...

1. हृदयाचा सच्चा दोस्त
अंकूर आलेल्या लसणाचे सेवन करणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असते. या प्रकारच्या लसणामुळे आपल्या शरिरातील रक्ताभिसरण निरंतर आणि विना अडचण  सुरु राहते.

2. प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आवश्यक
अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच याचं सेवन केल्यामुळे आपलं शरिर अनेक रोगांशी लढण्यासाठी सुसज्ज होतं.

हेही वाचा - डायबेटीजचे रुग्ण खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे

3. त्वचा ठेवतं तजेलदार
अंकूर आलेल्या लसणामध्ये एँटी-ऑक्सिंडट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे आपल्या शरिरातील तणाव कमी होतो तसेच आपली त्वचा नेहमी तजेलदार राहते. आपला उत्साह तसेच आपला मूड फ्रेश राहण्यास मदत होते.

4. ब्लड प्रेशर ठेवतं नियंत्रणात
ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर अथवा लो ब्लड प्रेशरची समस्या असते त्यांनी आवर्जून अंकूर आलेल्या लसणाचे सेवन करायला हवे. अंकूर आलेल्या लसणाचे सेवन करण्याने आपल्या शरिरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

5. कॅन्सर होण्याचा धोका होतो कमी
खूप कमी लोकांना हे माहितीय की, अंकूर आलेल्या लसणामध्ये फायटोन्यूट्रिएंड्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे तत्त्व आपल्या शरिरासाठी खूपच आवश्यक आहे. कारण यामुळे आपल्या शरिराला कॅन्सरसारख्या आजाराविरोधात सुरक्षेचं कवच प्राप्त होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know all the importance of sprouted garlic why should it be ate