esakal | विद्यार्थ्यांनो स्मरणशक्ती वाढवायचीये? मग दररोज खा काळी द्राक्षं; जाणून घ्या हे ५ फायदे 
sakal

बोलून बातमी शोधा

black grapes

त्वचेच्या समस्यांपासून तर हृदयविकारांपर्यंत सर्व रोगांशी लढण्याची ताकद काळ्या द्राक्षांचं सेवन केल्यामुळे आपल्याला मिळते. तसंच परीक्षांचा काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्याचं कामही द्राक्षं करतात.

विद्यार्थ्यांनो स्मरणशक्ती वाढवायचीये? मग दररोज खा काळी द्राक्षं; जाणून घ्या हे ५ फायदे 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर:  द्राक्षं म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात हिरवी, पिवळी आणि काळी गोडं द्राक्षं. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत द्राक्षं न आवडणारा व्यक्ती सापडणार नाही. इतर फळांपेक्षा आकारानं लहान असेल तरी द्राक्षांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यातही काळी द्राक्षं आपल्या शरीरातील समस्यांसाठी अधिक फायदेशीर आहेत.

त्वचेच्या समस्यांपासून तर हृदयविकारांपर्यंत सर्व रोगांशी लढण्याची ताकद काळ्या द्राक्षांचं सेवन केल्यामुळे आपल्याला मिळते. तसंच परीक्षांचा काळ असल्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्याचं कामही द्राक्षं करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याच काळ्या द्राक्षांचे काही फायदे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकाल. 

हेही वाचा - भारतरत्नांना कोणासमोरही देशप्रेम सिद्ध करण्याची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका 

हे आहेत काळी द्राक्षं खाण्याचे काही फायदे :

मधुमेहींसाठी उपयुक्त 

काळ्या द्राक्षांमध्ये रेटवरसॉल नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे आपल्या राजतमध्ये इन्सुलिन वाढण्यास मदत होते. म्हणून मधुमेहींनी दररोज काळी द्राक्षं खाणं महत्वाचं आहे. 

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही त्यासाठी डायट करत असाल तर तुम्हाला दररोज काळी द्राक्षं नक्की खाल्ली पाहिजेत. काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या ॲंटीऑक्सीडेंटमुळे शरीरातील घाण बाहेर निघून वजन कमी होण्यास मदत होते.   

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत

दररोज काळ्या द्राक्षांचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्याशी मदत होते. काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या सायटोकेमिकल्समुळे हृदयासंबंधीच्या कुठल्याही समस्या जाणवत नाहीत. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही नियंत्रित राहण्यास मदत होते. 

हेही वाचा - 'बर्ड फ्लू'मुळे बकरे, मासे खाऊ लागले भाव, दर...

केसांसाठी उपयुक्त 

केस गळणे, केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे या समस्यांपासून अनेकजण त्रस्त असतात. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन 'ई'मुळे या समस्यांपासून तुमचा बचाव होऊ शकतो. 

स्मरणशक्ती वाढवण्यास पूरक 

पाल्याची स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठी पालक नेहमीच खटोटोप करत असता. अनेक प्रकारची औषधंही पाल्यांना देतात. मात्र पालकांनो आता तुमच्या पाल्याला दररोज काली द्राक्षं खायला द्या. द्राक्षांमधील औषधी गुणधर्मांमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ

loading image