ॲसिडिटीनं जगणं कठीण झालंय? आहारात या ५ पदार्थांचा करा वापर; क्षणात मिळेल आराम

know remedies to control acidity in few minutes Nagpur News
know remedies to control acidity in few minutes Nagpur News

नागपूर: नेहमीची दगदग, काम, टेन्शन या गोष्टींमुळे मानवी शरीरावर सतत काही ना काही परिणाम होत असतात. मात्र अनेक विकार असेही आहेत जे साधे वाटतात पण याचे गंभीर परिणाम पुढील आयुष्यात भोगावे लागू शकतात.  एक विकार असा आहे जो या जगातील प्रत्येक व्यक्तीला सतत होत असतो. तो विकार म्हणजे छातीत जळजळ होणे म्हणजेच ॲसिडिटी. मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा जेवणाच्या वेळेत बदल झाल्यामुळे नेहमीच आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. मात्र यासाठी आपण बाजारातून औषधं आणून वेळ निभावून नेतो. 

ॲसिडिटीमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. इतकंच नव्हे तर अगदी तुमच्या हृदयावरसुद्धा ॲसिडिटीमुळे परिणाम होऊ शकतो मात्र आता चिंता करू नका. तुमच्या आहारामध्ये पुढे दिलेल्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही ॲसिडिटीपासून मुक्तता मिळवू शकणार आहात.   

या पदार्थांचा आहारात करा समावेश 

थंड दूध 

ॲसिडिटी झाल्यास रात्री झोपताना एक कप थंड दूध पिणं चांगलं आहे हे तुम्ही ऐकलंच असेल. थंड दूध पिल्यामुळे आपल्या शरीरातील गॅस्ट्रिक रस जास्त प्रमाणात वाढू शकत नाही आणि यामुळे ॲसिडिटी नियंत्रणात येते.त्यामुळे घरी काहीच उपलब्ध नसल्यास थंड दूध हाच ॲसिडिटीवरील रामबाण उपाय आहे. 

विलायची

विलायचीमुळे पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. तसंच आपल्या पोटात निर्माण झालेल्या ॲसिडलाही कमी करण्यास मदत करते. त्यामुळे ॲसिडिटी झाल्यास २ विलायची घेऊन त्यांना पाण्यात उकळून घ्या आणि काही वेळानं थंड करून हे पाणी प्या. असं केल्यास ॲसिडिटी कमी होण्यास मदत होईल. 

तुळशीची पानं 

तुळस हे शरीरातील कुठल्याही रोगासाठी सर्वोत्तम आयुवेदिक औषध आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणूनच ॲसिडिटीचं प्रमाण कमी करण्यासाठीही तुळशीच्या पानांचा वापर होतो. जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर ४-५ तुळशीची पानं चावून खा किंवा एक कप पाण्यात उकळवून घ्या. जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत तुळशीच्या पानांचं सेवन करत राहा.  

ताक 

तुळशीच्या पानांप्रमाणेच ताकही ॲसिडिटीला मारक आहे. ताकात असलेल्या लॅक्टिक ॲसिडमुळे ॲसिडिटी नियंत्रणात राहण्यास मदत होते. म्हणूनच आपण नेहमी अधिक जेवण झाल्यास किंवा अपचन झाल्यास ताक पितो. डॉक्टरही दररोज एक ग्लास ताप पिण्याचा सल्ला देतात.  

केळी 

केळांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात अँटासिड असते ज्यामुळे ॲसिडिटी नियंत्रणात राहण्यास मदत होते. दररोज एक केळ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात ॲसिडिटी होत नाही. म्हणूनच ॲसिडिटी झाल्यास डॉक्टर नियमितपणे केळी खाण्याचा सल्ला देतात. 


संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com