काय सांगता! प्रजनन क्षमतेवर होतो वातावरणाचा परिणाम, वाचा काय सांगतेय संशोधन

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

मानवी शरीर जे वातावरणानुसार कार्य करत असून हार्मोनच्या स्त्रवणावरही वातावरणाचाच परिणाम होतो. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही इतर सजीव प्राण्यांमध्ये मानवी शरीरामध्ये होणाऱ्या जैविक क्रियांवर तापमानाचा परिणाम होत असतो.

नागपूर : तापमान कमी-जास्त झाल्यास शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. त्यामुळे प्रजनन क्षमता ही वातावरणावर अवलंबून असते. याबाबत इस्त्राईल येथे संशोधन झाले असून त्यामध्ये जवळपास ४ कोटी ६० लाख लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

हेही वाचा - ब्रेकिंग: नागपूरच्या वाडीजवळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला...

संशोधनानुसार, मानवी शरीरातील पिट्युटरी ग्रंथीमधील हार्मोन्सची पातळी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये  वाढलेली असते. हे हार्मोन्स पाचन क्षमता, स्त्रियांमध्ये दूध येणे, तसेत ताण-तणावामध्ये महत्वाची भूमिका निभवतात. या ग्रंथीच्या नियंत्रणाखाली जे शरीराचे भाग असतात ते वातावरणानुसार काम करतात. त्यामुळे हिवाळा किंवा वसंत ऋतूमध्ये टेस्टोस्टेरॉन, एस्ट्राडियॉल, प्रोजेस्टेरॉन आणि थॉयराईड हे हार्मोनचे मोठ्या प्रमाणात स्त्रवण करतात. यावरून असे स्पष्ट होते की, मानवी शरीर जे वातावरणानुसार कार्य करत असून हार्मोनच्या स्त्रवणावरही वातावरणाचाच परिणाम होतो. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही इतर सजीव प्राण्यांमध्ये मानवी शरीरामध्ये होणाऱ्या जैविक क्रियांवर तापमानाचा परिणाम होत असतो. हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये आपल्या पाचन क्षमतेमध्ये सुधार होऊन प्रजनन क्षमता वाढते. त्यातच ताण-तणावामध्येही वाढ होते. हे सर्व वाढविण्यासाठी काम करत असलेल्या हार्मोन्सवर वातावरणाचा प्रभाव असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचमुळे प्रजनन क्षमतेमुध्ये सुधार होण्यास मदत होते. 

हेही वाचा - खुनाच्या घटनेनं हादरली उपराजधानी: उपमुख्यमंत्री जाताच कुख्यात गुंडाचा दगडानं ठेचून खून 

इतर प्राण्यांवरही होतो परिणाम -

ध्रुवीय बारसिंगा - हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतो. त्यामुळे बारसिंगासारख्या स्तनदा प्राण्यांमध्ये लेप्टीन हार्मोनचे प्रमाण घटते. त्यामुळे ऊर्जा कमी होऊन शारीरिक तापमानामध्ये घट होते. त्यामुळेच प्रजनन क्षमता अधिक सक्षम होण्यास मदत होते.

रिसस मैकैकी - रीसस मैकेकी या नरवानर समुहातील प्राण्यांमध्ये मान्सूनच्यानंतर प्रजनन प्रक्रियेची क्षमता वाढते. त्यामुळेच अशा प्राण्यांमध्ये प्रजनन दर इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक दिसतो.

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: weather affects fertility says study nagpur news