वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग फायद्याचा! जाणून घ्या नवा प्रकार| Interval Walking For Weight Loss | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

walking
वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग फायद्याचा! जाणून घ्या नवा प्रकार| Interval Walking For Weight Loss

वजन कमी करण्यासाठी इंटरव्हल वॉकिंग फायद्याचा! जाणून घ्या नवा प्रकार

वजन कमी (Weight Loss) होत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. त्यासाठी नव्या वर्षात व्यायाम (Exercise) करायचा संकल्प करतात. पण अनेक लोकांचे वजन चालण्यामुळे कमी होत नसल्याने ते व्यायाम करणे बंद करतात. असे काही तुमच्या बाबतीत होत असेल तर, इंटरव्हल वॉकिंग हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. इंटरव्हल वॉकिंगमध्ये (Interval Walking) तुम्हाला फास्ट चालावे लागते. त्यामुळे चरबी जाळली जाऊन वजन झपाट्याने कमी होते. या चालण्यादरम्यान शरीराला थोडा थोडा आराम ( Interval) दिला जातो. प्रत्येक ब्रेकसाठी किंवा आरामासाठी वेळ निश्चित केली जाते.

अशाप्रकारे चालल्याने शरीराला जास्त थकवा येत नाही. तसेच लवकर बरेही वाटते. या मध्यांतरादरम्यान, तुम्ही सामान्य श्वास घेता, ज्यामुळे तुम्हाला तुमची फिटनेसचे उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे होते. जर तुम्हाला अशा प्रकारे वजन कमी करायचे असेल, तर इंटरव्हल वॉकिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे.

हेही वाचा: मटण आवडतं! मग, हा प्रकार खाण्याआधी फायदे-तोटे जाणून घ्या

अशी करा सुरूवात

१) याची सुरूवात करण्यासाठी स्मार्टवॉच किंवा स्टॉप वॉचचा उपयोग करू शकता. आधी पाच मिनिटे वॉर्म अप करा. या 5 मिनिटात संथ गतीने चाला म्हणजे जास्त थकवा येणार नाही. असे केल्याने शरीर उबदार राहते. यानंतर एका मिनिटात सुमारे 100 पावले चालण्याचा निर्णय घ्या. यावेळी, खोल श्वास घ्या. तुमचा श्वास नॉर्मल राहील हे लक्षात ठेवा.

हेही वाचा: Benefits Of Evening Exercise : संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे माहितीये का?

२) वॉर्म अप केल्यानंतर पहिला इंटरव्हल सुरू करा. जर तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तर 30 सेकंदांचा अंतर ठेवा. या दरम्यान चालताना हळू हळू पावले टाका आणि पूर्ण जोर देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपले हात पुढे आणि मागे जोरदारपणे हलवा. इथे तुम्हावा दम लागेल. 30 सेकंदांनंतर, नॉर्मल चालण्याकडे परत या आणि 2.30 मिनिटे तेच चालणे करा. त्याचप्रमाणे, 5 पूर्ण इंटरव्हल करा आणि जेव्हा हे कार्य पूर्ण होईल, तेव्हा 5 मिनिटांच्या कूल डाउनसह ते पूर्ण करा.

हेही वाचा: अंजीर खा, वजन कमी करा

३) अशाप्रकारे, जर तुम्ही अर्ध्या तासाच्या वर्कआउटचे नियोजन करू शकता. त्यासाठी, सुरुवातीला 5 मिनिटे लाइट वॉर्म अप, 5व्या ते 7व्या मिनिटाला जलद चालणे, 7व्या ते 8व्या मिनिटाला लाइट वॉक, 8व्या ते 10व्या मिनिटाला शक्य तितक्या वेगाने चालणे. नंतर 10व्या ते 11व्या मिनिटापर्यंत हळू चालत जा. त्यानंतर, 11 ते 13 व्या मिनिटापर्यंत वेगाने चालत जा. त्यानंतर 13-14व्या मिनिटाला हलके चालावे. 15 मिनिटांनंतर, ते आणखी हलके करा. मग हळूहळू चालणे वाढवा. 25 व्या ते 30 व्या मिनिटात, अतिशय हलके चालताना हळू हळू थांबा. अशा प्रकारे, तुम्ही अर्धा तास वेगाने आणि हळू चालत रहा.

हेही वाचा: काढा प्या, प्रतिकारशक्ती वाढवा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top