Liquorice is helpful in corona time
Liquorice is helpful in corona time

कोरोनाकाळात ज्येष्ठमध आहे सर्वात गुणकारी; सर्दी, खोकल्यापासून बचावासाठी रामबाण उपाय

नागपूर: घरोघरी सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे ज्येष्ठमध. ज्येष्ठ मधामधे फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, कॅल्शियम आणि जस्त यासारखे खनिजे आहेत. तसेच ज्येष्ठमध जीवनसत्व 'ब' आणि जीवनसत्व 'ई'चा चांगला स्त्रोत आहे. कोरोना काळात हेच जीवनसत्व घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेष्ठमधाचे काही फायदे सांगणार आहोत. ज्यामुळे या कोरोनाकाळात तुम्हाला सर्दी खोकल्यापासून नक्कीच बचाव करता येईल. 

जेष्ठमधात आहेत अँटीऑक्सीडंटचे गुणधर्ण -

घशात खवखव असेल किंवा सर्दी, खोला अथवा दम्याचा त्रास असेल तर जेष्ठमध त्यावरील उत्तम उपाय आहे. कोरोना काळात होणारा श्वसनमार्गाचा संसर्ग देखील ज्येष्ठ मधामुळे दूर होतो.  यामध्ये अँटीऑक्सीडंटचे गुणधर्ण असल्यामुळे ब्रोन्कियल ट्युबची जळजळ कमी होते. तसेच वायूमार्गाचा त्रासही कमी होतो. त्यामुळे कोरोना काळात जेष्ठमधाचे सेवन करणे फायदेशीर आहे.
 

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत -
कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. ज्येष्ठमधातील जैव-सक्रिय घटक दुर्बलता, अशक्तपणा आणि थकवा कमी करतात. शरीरामध्ये नवीन ऊर्जा संचारते. तसेच शरीराचे विविध विषाणू, जीवाणूंच्या संक्रमणापासून संरक्षण करतात.

पचनासाठी मदत -
अनेकदा आपल्याला पचनासंबंधी समस्या उद्भवतात. पोट फुगणे, सूज येणे तसेच पोटातील अस्वस्थता यांसारख्या काहीही समस्या असतील तरी जेष्ठमधामुळे कमी होतात. अपचनाची समस्या कमी होते आणि भूक वाढण्यास मदत होते. 

यकृताच्या आजारावर फायदेशीर -
ज्येष्ठमधातील अँटिऑक्सिडंट यकृताचे फ्री रेडिकल्स आणि विषारी घटकांमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतात. हे हेपेटायटीस, चरबीयुक्त यकृत, कावीळ यासारख्या आजारांवर उपचारासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला यकृताचा आजार असेल तर ज्येष्ठमध घालून तयार केलेल्या चहाचे सेवन करा. 

अल्सरमध्ये फायदेशीर -
अनेकजण तोंडाच्या अल्सरमुळे त्रस्त असतात. ज्येष्ठमधाचे सेवन केल्यास त्यावर आराम मिळू शकतो. कारण ज्येष्ठमधामध्ये उपस्थित बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड कार्बेनॉक्सोलोन, तोंड आणि जठरासंबंधी अल्सरच्या उपचारात फायदेशीर ठरते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com