डास खूप त्रास देताहेत, घरगुती उपायातून पळवा मच्छरांची पिडा

Mosquitoes can be repelled by home remedies
Mosquitoes can be repelled by home remedies

नागपूर : पावसाळ्याच्या दिवसांत डास प्रत्येकाची झोप उडवतात. डासांपासून वाचण्यासाठी सर्वसाधारणपणे बाजारात मिळणाऱ्या मौस्कीटो रेपेलन्टचा वापर केला जातो. परंतु त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. ऋतूबदलाच्या काळात डासांची संख्या वाढते. सध्या आपण तेच दिवस अनुभवत आहोत. पहाटेच्या वेळी हलकी थंडी आणि दिवसभर उन्ह यामुळे आजार बळावतात. आजारांचे मुख्य कारण डास आहेत. पुढील उपायांनी डासांपासून सुटका मिळविणे शक्य होणार आहे.

कडुनिंब अनेक गुणांचे भांडार आहे.  म्हणूनच त्याला गावातील दवाखाना म्हटले जाते. प्रकृतीसाठी उपयोगी असलेला कडुनिंब डास व माशा यांना आपल्यापासून दूर ठेवतो. कडुनिंबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळून मिश्रण तयार करा. या मिश्रणाला आपल्या शरीरावर लावा. या तेलाचा प्रभाव कमीत कमी आठ तास तुमच्या शरीरावर राहतो. याप्रमाणे डास किंवा माश्या तुमच्या शरीराजवळही फिरकणार नाहीत. 

कडुनिंबाच्या तेलात कापूर मिसळून एका स्प्रेच्या बाटलीत भरा. आता हे मिश्रण तमालपत्रावर शिंपडा आणि तमालपत्र जाळा. तमालपत्राचा धूर तब्येतीसाठी कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही. भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती मिळतात. ज्यामध्ये अशी काही रोपे आहेत, जी डासांना पळवून लावून वातावरणही स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. या रोपांमध्ये पवित्र तुळशी, पुदिना आणि लेमनग्रास ही रोपे मुख्य मानली जातात. या रोपांना आपल्या बागेत किंवा व्हरांड्यात लावल्यामुळे तुम्ही पावसाळी दिवसात आपल्या बागेचा आनंद घेऊ शकता व डासांपासून स्वत:ला वाचवू शकता.

डास चावणे अनेक आजारांचे कारण होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांत डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यापासून सुटका मिळविण्यासाठी बरेच घरगुती उपाय आहेत. डासांच्या अनेक जाती असतात. ज्यांना जंतू आणि घाम या दोन्ही गोष्टी प्रिय आहेत. काही डास एखाद्या विशिष्ट वासाने आकर्षित होतात. डास संध्याकाळच्या वेळी आपले खाणे शोधतात. त्यांना वासाची चांगली जाण असते. हेच कारण आहे, की ते रक्ताचा स्त्रोत असलेला माणूस व प्राणी यांचा शोध घेतात. कार्बन-डाय-ऑक्साइड आणि आपल्या शरीराला येणारे काही प्रकारचे गंध हे डासांसाठी महत्वाचे असतात.

डास जवळपास सर्व परिसरात होणारा  कीटक आहे. पावसाळ्यात तर डासांचा  प्रचंड त्रास होतो. डास कमी करण्यासाठी आपण अनेक स्प्रे  किंवा केमिल्स वापरतो पण त्याचा तितकासा परिणाम होत नाही. संध्याकाळच्या वेळेस तर डास प्रचंड त्रास देतात. डास चावल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. डास घालवण्यासाठी काही घरगुती उपाय.

गुणकारी कापूर

आपल्या देशात अनेक गोष्टी पूर्वीपासून केल्या जातात. त्यामागे काही शास्त्रीय कारण असते. ही शास्त्रीय कारणे आपण कधीच जाणून घेत नाहीत आणि आपण त्या गोष्टीला नाव ठेवण्यास सुरुवात करतो. जसे की कापूर संध्याकाळच्या वेळेस जाळतात आणि यामागचे कारण असे की कापुर जाळला की सर्व कीटक मरतात. डासांसाठी कापुर जालीम औषध आहे. संध्याकाळच्या  वेळेस तुम्ही कापुर जाळा आणि काही काळ दारे खिडक्या बंद करा सर्व डास  सर्व मरून पडतील. भीमसेनी कापुर हा अतिशय उपयुक्त आहे.

लसणाच्या तीव्र वासामुळे डास छुमंतर

लसूण डासांसाठी अतिशय उपयुक्त आहे. लसणाच्या तीव्र वासामुळे डास मरून जातील. त्यामुळे लसूण सर्वत्र ठेवावा. त्यामुळे डास मरून जातील. तेरडा किंवा  लैवेनडर – फिक्या जांभळ्या रंगाचे हे फूल असते , या फुलांच्या वासाने डास मरून जातात. ओवा आणि मोहरीचे तेल यांचा वापर करून  डासांना पळवू शकता. ओव्याचे पावडर आणि मोहरीचे तेल एकत्र  करून ते कागदावर लावा आणि तो कागद घरात बांधा सर्व  डास मरून जातील.

लिंबाचा रस, निलगिरीचे तेल डासांचे शत्रूच

लिंबाचा रस आणि निलगिरीचे तेल एकत्र करून तुम्ही जर शरीराला लावले तर तुम्हाला अजिबात डास चावणार नाहीत. या बरोबरच लिंबाचे तेल आणि आपले खोबरेल तेल एकत्र करा आणि त्याचा दिवा घरात लावल्यास  खूप फरक जाणवेल.  पुदिना खूप उपयुक्त आहे. पुदिन्याची पाने तुम्ही घरात पसरावा आणि फरक जाणून घ्या. अशाप्रकारे तुम्ही  डासांना पळून लावू शकता. 

संकलन, संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com