
सुपर फूड म्हणून ओळखली जाणारी निळ्या व जांभळ्या रंगांची फळे आणि भाज्या हृदयाच्या आरोग्यासाठी, मधुमेहासाठी व शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम मानल्या जातात.
रेनबो डाएटची ढोबळपणे व्याख्या करायची झाल्यास, इंद्रधनुष्याच्या सात रंगांनी परिपूर्ण आहार, अशी होते. निसर्गाने फळे व भाज्यांमध्ये या सातही रंगांची मुक्तहस्ते उधळण केली आहे व त्यातील प्रत्येक रंगाच्या भाज्या व फळांचे शरीराला वेगवेगळे फायदे आहेत. आपल्या जेवणात विविध चवींचे व निरनिराळ्या रंगांचे पदार्थ असतील, तर जिभेला व डोळ्यांना आनंद मिळतोच; पण ते जेवण आरोग्यदायीही होते. अनेक पोषणमूल्यांनी परिपूर्ण अशा फळे व भाज्यांमध्ये स्निग्धता आणि कोलेस्ट्रॉल हे अगदी कमी प्रमाणात असून, ते शरीराला कर्बोदके, तंतुमय पदार्थ आणि अनेक जीवनसत्त्वे व खनिजे पुरवितात. त्यात उष्मांक फारच कमी असतो व त्यातून शरीराला उपयुक्त नैसर्गिक साखर मिळते.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लाल व केशरी फळे आणि भाज्या डोळे व त्वचेसाठी फायदेशीर आहेत, तर पिवळ्या आणि पांढऱ्या भाज्या रक्तदाब व कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांसाठी अतिशय उपयोगी आहेत. हिरव्या भाज्यांत भरपूर लोह असून, त्या हाडांना मजबुती देण्यासाठी उपयुक्त ठरतात. सुपर फूड म्हणून ओळखली जाणारी निळ्या व जांभळ्या रंगांची फळे आणि भाज्या हृदयाच्या आरोग्यासाठी, मधुमेहासाठी व शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम मानल्या जातात.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आहारतज्ज्ञांच्या मते, रेनबो डाएट करताना आपल्या रोजच्या आहारात पाच प्रकारच्या भाज्या व दोन फळे ह्यांचा समावेश असावा. त्यासाठी फळांचा रस, चाटमसाला घातलेल्या फळांच्या फोडी, कच्च्या कोशिंबिरी, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स, टोमॅटो, पालक किंवा मिश्र भाज्यांचे सूप, स्मूदी, मिल्कशेक, फ्रुट सॅलड, फळे घातलेले दही, वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्या व चटण्या, असे असंख्य पर्याय आहेत.
रेनबो डाएटचे फायदे
शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढते
हृदय अधिक कार्यक्षम बनते
शरीराचा थकवा जाऊन ताजेतवाने वाटते
वजन कमी करण्यासाठी हे डाएट अतिशय उपयुक्त आहे
डोळे व त्वचेचे आरोग्य सुधारते