कोरफडीचे तेल केसांसाठी सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

हेल्दी केस नेहमीच तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात
Aloe Vera Hair Oil Benefits
Aloe Vera Hair Oil Benefits
Updated on

लांब, दाट, काळे केस प्रत्येकाला आवडतात. हेल्दी केस नेहमीच तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. पण, आजच्या काळात केसांच्या समस्या (Hair Problem) खूप वाढल्या आहेत. यात अनेक कारणे असू शकतात, जीवनशैलीतील (Lifestyle)बदल, चुकीच्या खाण्याच्या सवयी, प्रदूषण, जास्त केमिकलयुक्त पदार्थांचा वापर आणि दिनचर्या यांचा त्वचेवर तसेच केसांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे केसात कोंडा, कोरडेपणा, केसाला फाटे फुटणे, केस अवेळी पांढरे होणे, केस गळणे अशा ससम्या निर्माण होतात.

थंडीत (Winter) प्रामुख्याने केसांची (Hair) काळजी घ्यावी लागते. तुम्हालाही केसांच्या या समस्या येत असतील. तुम्ही औषधी गुणधर्मासाठी कोरफडीचे तेल वापरू शकता. ते तुम्ही घरी अगदी सहज तयार करू शकता. तुमच्या आरोग्यासाठी (Health) कोरफड (aloe vera) अतिशय फायदेशीर आहे. अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्माने समृद्ध असलेल्या कोरफडीमुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच केसांना लांब, दाट करण्यास मदत करते. (Aloe Vera Hair Oil Benefits)

Aloe Vera Hair Oil Benefits
Hair Fall | फॉलो करा या Tips, ७ दिवसात केस गळणे कमी होईल
aloe vera
aloe veraesakal

तेल बनविण्याची पद्धत (How To Make Aloe Vera Oil)

एका भांड्यात १० चमचे कोरफडीचे जेल(Aloe vera Gel), १ नारळाचे तेल चांगले एकत्र करा, हे तेल केसांच्या मुळांना नीट लावून थोड्यावेळ मसाज करा. एक तासांनी शांपूने केस स्वच्छ धुवा.

हे होतात फायदे (Benefits Of Aloe Vera Gel)

-केसांना मॉइश्चरायझ करते.

-केसांचे पोषण होते.

-केसांचे गळणे कमी करते.

-केस वाढण्यासाठी मदत होते.

-कोंडा कमी करण्यास कारणीभूत.

-डोक्यातील खाज दूर होते.

Aloe Vera Hair Oil Benefits
सुंदर केसांसाठी घरीच बनवा कंडीशनर; केस होतील दाट, चमकदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com