esakal | Natural Weight Loss Tricks: घरगुती उपायांद्वारे करु शकता वजन कमी
sakal

बोलून बातमी शोधा

WEIHT LOSS

वजनावर नियंत्रण करण्यासाठी खानपान असेल किंवा दिवसाचे नियोजन, या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे.

Natural Weight Loss Tricks: घरगुती उपायांद्वारे करु शकता वजन कमी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पुणे: वजन कमी करण्याचा प्रयत्न बरेच जण करतात पण यामध्ये त्यांना अपयश येत असतं. वजन कमी करण्याच्या नादात आहार कमी करतात आणि त्याचा तोटा स्वतःच्या आरोग्यावर करून घेत असतात. वजन कमी करण्यासाठी एक हेल्दी रुटीन असणं गरजेचं असतं. खासकरून तुम्ही जर सकाळच्या रुटीनमध्ये योग्य तो बदल केला तर त्याचा मोठा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. सध्याच्या धावत्या जगात वजन कमी करण्यासाठी विविध ट्रीक्स वापरल्या  (Tricks For Weight Loss) पाहिजेत.

आहारात योग्य फळांचा, पालेभाज्यांचा आणि पेयांचा समावेश केला पाहिजे. वजनावर नियंत्रण करण्यासाठी खानपान असेल किंवा दिवसाचे नियोजन, या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. बरेच लोक एकदम टोकाचा डाइट प्लॅन (Diet Plan) आणि कठोर व्यायाम करतात. पण याचा उपयोग बऱ्याचदा होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा समावेश तुमच्या दैनंदिन जिवनात करू शकता.

सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

1) सकाळचा व्यायाम-
हेल्दी आणि फीट राहण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी सकाळी योग्य व्यायाम करणे गरजेचं असतं.  

2) गाजर 
थंडीच्या दिवसात गाजर खाल्यास आपल्याला फायदा होतो. थंडीच्या दिवसांत जवळपास सर्व पालेभाज्या आणि फळे ही बाजारात सहज उपलब्ध असतात. थंडीच्या दिवसांत गाजरही बाजारात उपलब्ध असते. जर तुम्ही आपल्या आहारात गाजराच्या पदार्थांचा समावेश केला तर तुम्हाला ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते. गाजरापासून बनवलेला ज्यूस तसेच गाजराचा हलवाही आपण खाऊ शकतो. तसेच कच्चे गाजरही आपण खाऊ शकतो.

3) मेथी :
मेथीचा दाना-दाना हा आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. मेथी ही पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते. मेथी ही थंडीच्या दिवसांत येते. मोसमानुसार येणारी ही भाजी असून थंडीच्या दिवसांत खूप फायदेशीर ठरू शकते. पचन व्यवस्थित झाल्याने विणाकरण आपले वजन वाढत नाही. याचाही फायदा मेथीची भाजी खाल्याने होतो. म्हणून आपल्या आहारात मेथीच्या भाजीचा समावेश केल्यास फायद्याचे ठरते.

कोरोना रुग्णांमध्ये आढळली vitamin D ची कमतरता; 5 पदार्थांचे करा सेवन

4) दालचिनी :
दालचिनी ही डायबिटीज असणाऱ्यां माणसांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ही दालचिनी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात येते. थंडीच्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात दालचिनीचा समावेश करणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दिवसांतून तीन वेळा गरम पाण्यात दालचिनी आणि मध टाकून पिल्यास हे अत्यंत फायदेशीर ठरते. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी, नाष्ट्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे हे पाणी तीनवेळा पिल्यास लवकर वजन कमी होण्यास मदत होते.

(Desclaimer: ही माहिती सर्वसाधारण आहे. तुम्ही याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.)

(edited by- pramod sarawale)