साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? वाचा नागोबाची संपूर्ण माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? वाचा नागोबाची संपूर्ण माहिती

साप नेहमी जीभ बाहेर का काढतो? वाचा नागोबाची संपूर्ण माहिती

नागपूर : सापांचे (snake) भारतात अनेक प्रकार आहेत. त्यातील खूपच कमी साप विषारी आहेत. सापाच्या विषाने मरण्यापेक्षा साप चावल्याच्या भीतीने मृत्यू आल्याची संख्या जास्त आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक साप हा विषारी नसतो. उंदरांचा नायनाट करून शेतकऱ्यांसाठी साप हा लाभदायकच (Snakes are beneficial for farmers) ठरतो. मात्र, सर्पदंशाचा उपचार हा खूप जोखमीचा (Treatment of snakebite is very risky) असतो. विषारीपणाची खात्री पटल्यानंतर ताबडतोब उपचार सुरू झाले तर जीव वाचण्याची खूप शक्यता असते. यात जेवढा उशीर होईल तेवढे नुकसान अधिक. योग्य उपचार झाले तर विषारी दंश झालेल्यापैकी ८० टक्क्यांपर्यंत व्यक्ती वाचू शकतात हे निश्चित. चावलेला साप विषारी की बिनविषारी आहे हे माहीत नसल्यास सर्पविषाच्या लक्षणांची व चिन्हांची सुरवात दिसत असेल तरच उपचार केले पाहिजेत. (Don't-be-afraid-of-snakes-focus-on-treatment)

 • साप हा मांसाहारी जीव आहे.

 • साप उंदीर, पाल, अन्य कीटक खाण्यासाठी बाहेर पडतो.

 • दूध हे सापाचे अन्न नाही.

 • नागपंचमीला दूध पाजणे वगैरे थोतांड असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 • सापाला कान नसतात.

 • त्याला लांबचे दिसत नाही.

 • सापाची स्मरण शक्ती अल्प असते.

साप नेहमी जीभ बाहेर का काढतो

साप जीभेने वास घेतो. त्यामुळे तो जीभ बाहेर काढून आसपासच्या प्राण्यांचा अंदाज घेत असतो. हालचाल होत असल्यास त्याच्या कंपनातूनही तो सभोवताली कोणी असल्याचे जाणून घेतो.

समाजमनातील अंधश्रद्धा

 • सापाच्या डोक्यावर मणी असतो

 • सापाला केस असतात

 • साप धनाचे रक्षण करतो

 • साप पाठलाग करतो

 • साप बदला घेतो

 • साप दूध पितो

साप पुंगीवर नाचतो?

खरं म्हणजे सापाला पुंगीचा आवाजच ऐकू येत नाही. गारुडी जेंव्हा पुंगी वाजवतो तेव्हा त्यावर झडप घेउन चावा घेण्यासाठी साप हलत असतो. लोक त्याला सापाचे नाचणे किंवा डोलने समजतात.

भारतात सुमारे ५०० प्रकारचे साप आढळतात

विषारी साप ः रसेल व्हायपर, कोब्रा, कारीट, वायपर, समुद्री साप, चापडा आणि अन्य १० प्रकारचे साप विषारी गणले जातात.

बिनविषारी साप ः अजगर, धामण, तस्कर, गवत्या, वाळा, दिवड, हरणटोळ, नानेटि, मांडोळ आदी

विषारी साप कसा ओळखावा

नाग - जो फणा काढून उभा राहतो तो नाग. सायकलच्या ट्यूबमधून निघणाऱ्या हवेचा फुस्स असा आवाज येत असेल तर तो नाग असेल असे समजावे.

मण्यार - काळपट निळसर रंग, अंगावर पांढरे पट्टे. डोक्याकडे कमी जाडी तर शेपटीकडे जास्त जाडी असते. हा साप इतर सापांनाही खातो.

फुरसे - फूटभर लांबी, शरीरावर नक्षीकाम, डोक्यावर बाणासारखी खूण, करवतीसारखा करकर आवाज करतो.

घोणस - हा साप कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो. अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे ठिपके असणाऱ्या रेषा असतात. डोक्यावर इंग्रजी व्ही अक्षर असते.

प्राणघातक ठरू शकणारे सापाच्या विषाचे प्रमाण

नाग - १२ मिग्रॅ

मण्यार - ६ मिग्रॅ

फुरसे - ८ मिग्रॅ

घोणस - १५ ग्रॅम

सापाचे विष दोन प्रकारचे आहे

न्यूरोटॉक्झिक (नाग, मण्यार)

हिमोटॉक्झिक (घोणस, फुरसे)

सर्पदंश टाळण्यासाठी सावधगिरी

 • पलंगावर झोपा

 • मच्छरदाणीचा वापर करा

 • शेतात काम करताना बूट घाला

 • घरासभोवतालचे दगडांचे ढीग, पालापाचोळा, सरपणाचे ढीग दूर करा

 • घरातील उंदरांचा बंदोबस्त करा

साप दिसला तर काय करावे

जर आपल्याला कोठेही साप दिसला तर आपण त्या सापापासून लांब राहून लवकरात लवकर साप पकडणाऱ्या माणसाला बोलवावे अथवा गलोलीसारख्या काठीने त्या सापाच्या पाठीमागे जाऊन त्या सापाचा फणा दाबून त्याला एका कापडी पिशवीत टाकून ती पिशवी दोरी किंवा वेलीने घट्ट बांधावी. साप जास्त करून आपल्या आजूबाजूच्या परिसरात मिसळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे साप कुठे आहे हे आपल्याला लवकर लक्षात येत नाही. आपण जर घनदाट जंगलातून जात असू तर आपल्या सर्वांगाला झाकण्याचा प्रयत्न करा व डोक्यावर जाड कापडी टोपी घाला. आपल्या पावलांचा आवाज शक्यतो होऊ देऊ नका व जर तुम्हाला कुठली जरी हालचाल दिसली तर लगेच घाबरून न जाता ती हालचाल कशाची आहे हे सावधगिरीने शोधा. असा अंदाज बांधा की साप इथेच कोठे तरी आहे व त्यानुसार तुमची हालचाल सावधपणे करा.

लक्षणे व उपचार

साप चावण्याची सामान्य लक्षणे आहेत, उल्टी होणे, चक्कर येणे, थंडी, चिकट त्वचा, दूरदर्शन. आपण जेव्हा कुठल्याही जंगलात किंवा घनदाट झाडीत जातो, तेव्हा साप चावण्याची शक्यता जास्त असते. साप चावल्यावर ज्या जागी सापाने दंश केल्यावर त्या जागी काळे-निळे होते. जर आपण त्यावर लवकरात लवकर उपचार केले नाहीत तर ते विष रक्ताद्वारे पूर्ण शरीरात भिनते व त्यामुळे माणसाचा मृत्यूपण होऊ शकतो. जर आपल्याला असे आढळून आले की आसपास कोणालातरी साप चावला आहे तर आपण त्यावर काही प्राथमिक उपचार करू शकतो, जसे की, त्या माणसाला जेथे साप चावला आहे त्याच्या बाजूला पटकन कापडाचा तुकडा बांधावा जेणे करून ते विष शरीरात अजून कुठे भिनू नये व जमल्यास त्या व्यक्तीला त्वरित दवाखान्यात घेऊन जावे. तोंडाने विष चोखून थुंकून काढताना जर ते विष काही प्रमाणात तोंडात राहिले तर त्यामुळे आपल्यालाही विषबाधा होऊ शकते.

साप ओळखणे

सापांची ओळख होणे हे उपचारासाठी महत्त्वाचे असते. पण त्या सापाची नेहमीच ओळख होईलच हे कधी-कधी संभव होत नाही. विषारी सापांमध्ये त्यांच्या विषावरून वाईपर, क्रेट्स आणि कोब्रा हे तीन प्रकार ओळखता येतात. या तिघांपैकी एक जरी साप चावला तर वैद्यकीय उपचार वेळेत घ्यावेत. साप तेव्हाच दंश करतो जेव्हा त्याला धोका जाणवतो. साप दंश करतो कारण त्याला तुम्ही एक चांगली शिकार वाटता. साप आपल्याला चावल्यावर न भीता प्रथमोपचार केले पाहिजेत व जवळच्या दवाखान्यात लगेच गेलं पाहिजे. सापाची ओळख होणे महत्त्वाचे आहे म्हणजे किमान तो विषारी आहे का बिनविषारी हे ओळखता आले पाहिजे.

सर्पदंशाची जखम

फुरसे, घोणस यांच्या दंशाच्या जागी खूप सूज येते व जखम चिघळते. कधीकधी संबंधित भाग सडून काळा पडतो. हा सगळा सर्पविषाचा परिणाम असतो. वेळीच उपचार झाले तर हे काही अंशी टाळता येते. पण जखम नंतर जंतुदोषामुळे जास्त चिघळते. यावर व्यवस्थित मलमपट्टी, जंतुविरोधी औषधे देऊन उपचार करावे लागतात.

सर्पउतारा (ऍंटी स्नेक व्हेनम)

नाग-मण्यार व घोणस-फुरसे यांची विषे वेगवेगळी असतात. पण या सर्व विषांना निकामी करणारा उतारा एकत्र केलेल्या स्वरूपात मिळतो. हे इंजेक्शन घोडयाच्या शरीरात सर्पविषे टोचून रक्तामध्ये जी प्रतिघटके तयार होतात त्या रक्तापासून बनवलेली असतात व ही सर्व प्रथिने असतात. हा पदार्थ कोरड्या स्वरूपात मिळतो आणि त्याला ठेवायला फ्रिजची गरज लागत नाही. शुध्द पाणी ठरावीक प्रमाणात मिसळून हे इंजेक्शन तयार करता येते. या इंजेक्शनला ‘ऍंटी स्नेक व्हेनम’ (म्हणजे सर्पविषाविरुध्दचा उतारा) असे म्हणतात. या औषधाने रक्तातल्या सर्पविषाचे सूक्ष्म कण नष्ट केले जातात.

सर्पदंशाच्या प्रसंगी काय करू नये?

 • मांत्रिकाच्या मागे लागून वेळ फुकट घालवू नका. साप चावून काही मांत्रिकही मेले आहेत.

 • रक्तप्रवाह थांबेल अशी आवळपट्टी अवयवास बांधू नका. पूर्वी अवयवावर एकाच ठिकाणी वर कुठेतरी आवळपट्टी बांधत असत. यामुळे जखमेतून जास्त रक्त जाते आणि त्या अवयवाचा रक्तपुरवठा थांबूही शकतो. दोन तासांहून जास्त वेळ अशी आवळपट्टी बांधल्यास हात काळा पडून शेवटी कायमचा गमवावाही लागू शकतो.

 • जखमेतून रक्त काढू नये. तसेच जखम कापू नये किंवा चोखू नये. याचा काहीही उपयोग नसतो. उलट ते घातकच ठरू शकते.

 • एक उपाय म्हणून काही लोक एकामागे एक कोंबडयांचे गुदद्वार जखमेला दाबून लावतात. याचा काहीच उपयोग नसतो. फक्त कोंबडया मरतात.

 • जर रुग्णालय व तज्ज्ञ वैद्यकीयसेवा अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल तर ताबडतोब रुग्णालयात नेणे चांगलेच. हे करीत असताना वाहनाची जुळवाजुळव, प्रवास, इत्यादी वेळात प्रथमोपचार करावेत.

सर्पविषाची लक्षणे व चिन्हे

 • चावणारा साप बिनविषारी असेल तर दातांच्या खुणा अर्धवर्तुळाकार रचनेत असतात. एक किंवा दोन दातांच्या खुणा असतील तर मात्र विषारी असण्याचा संभव असतो. कारण विषारी सापांचे विषारी दात हे इतर सापांच्या दातांपेक्षा लांब व तीक्ष्ण असतात. त्यामुळे विषारी दातांच्याच एक-दोन खुणा होतात.

 • सर्पविषाच्या इतर परिणामांचे स्वरूप हे सापाच्या जातीवर अवलंबून असते. किती विष शरीरात टोचले गेले आहे यावर परिणाम किती वेळाने व वेगाने होतात ते अवलंबून असते.

 • नाग, मण्यार ह्यांचे विष चेतासंस्थेवर तर फुरसे, घोणस यांचे विष रक्तावर बाधक असल्याने दोन्ही गटांची लक्षणे व चिन्हे वेगवेगळी असतात.

 • मण्यार, नाग यांच्या दंशानंतर अर्ध्या तासात किंवा त्याहून लवकर लक्षणे व चिन्हे दिसायला लागतात. मात्र चावून पंधरा तास गेले तरी काहीच परिणाम होत नसल्यास, सर्पदंश झाला असेल पण विष नाही, असा त्याचा अर्थ काढता येईल.

 • घोणस, फुरसे यांच्या दंशानंतर कमीअधिक वेळात रक्तस्राव चालू होतो. नाग-मण्यार यांच्या तुलनेने मात्र जास्त वेळ लागतो. फुरशाचे विष कमी असल्यामुळे जास्त वेळ लागतो. पण सुमारे दोन तास ते चोवीस तासांपर्यंत कधीही चिन्हे व लक्षणे दिसू लागतात.

परंपरेने चालत आलेले उपचार

 • सर्पदंशावर अनेक प्रकारचे परंपरागत उपचार केले जातात. मृत्यूशी गाठ असल्याने मांत्रिकांचाही आधार घेतला जातो. एकूण सर्पदंशाच्या घटनांपैकी काहीजण दगावतात तर ब-याच जणांना काहीही होत नाही. यावरून अमुक एक उपचार चांगला किंवा निरुपयोगी असे ठरवणे अवघड आहे. मुळात सर्पदंशाच्या 80 टक्के घटना बिनविषारी दंशाच्या असल्याने उपचार न केला तरी 80 टक्के घटनांच्या बाबतीत ‘यश’ असते. मात्र वीस टक्के अपयशी घटना विसरल्या जातात किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी दैवी कारण किंवा पाप असेल असे समजून सोडून दिले जाते.

 • देवळात नेण्याचा खरा एकमेव उपयोग म्हणजे धीर देणे. कारण काही जण तरी भीतीनेच दगावतात. पण यात देवळात वेळ गमावण्याचा धोका आहेच. आधुनिक वैद्यकीय सोयी जेवढ्या उपलब्ध होतील तेवढ्या प्रमाणात ही अंधश्रद्धा कमी होईल. मंत्राने सर्पविष उतरवणे या अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत. साप खेळवणा-या मांत्रिकांचेच मृत्यू सर्पदंशाने घडल्याच्या घटना आहेत.

शास्त्रीय प्रथमोपचार आवश्यक

 • योग्य व तत्पर प्रथमोपचारानेच बहुतेक रुग्ण वाचू शकतात. कोणतेही तंत्रमंत्र किंवा नवस केल्याने सर्प विष उतरत नाही. नव्वद टक्के लोक हे तो साप मुळात विषारी नसल्यानेच वाचतात. मात्र केवळ भीतीनेही जीव जाऊ शकतो.

 • संबंधित व्यक्तीला आणि कुटुंबातल्या लोकांना धीर दिला पाहिजे. बहुतेक साप बिनविषारी असतात हे त्यांना सांगून धीर द्या.

 • साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे. त्याला चालायला लावू नये. यामुळे विष लवकर पसरत नाही.

 • बिनविषारी साप असेल तर फक्त जखम धुऊन जंतुनाशक औषध लावले तरी पुरते. मात्र रुग्णाला काही तास नजरेसमोर ठेवणे आवश्यक असते.

 • संपूर्ण हात किंवा पाय लवचिक पट्टीने (इलॅस्टिक क्रेप बँडेज) बांधावा. यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरणार नाही. सर्व विष रक्तातून न पसरता मुख्यतः रससंस्था किंवा लसिकातून पसरते. थोडा दाब दिला तरी यातला प्रवाह थांबतो.

 • नंतर त्या हाताला किंवा पायाला लांब काठी बांधावी म्हणजे त्याची जास्त हालचाल होणार नाही.

 • साप चावलेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात न्यावे. झापड येत नाही ना किंवा कुठून रक्त वाहत नाही ना याकडे लक्ष ठेवावे.

आत्मसंरक्षणासाठी व शिकारीसाठी

सर्प दंशामुळे जखम वा विषबाधा होण्याची शक्यता असते. बहुतांशी सापाच्या जाती बिनविषारी असतात. ते भक्ष्य पकडण्याकरिता त्याला आवळून अथवा विष प्रयोगाने शिकार करतात. विषाचा वापर साप आत्मसंरक्षणाकरिता करत असतात. सापांच्या जास्त करून प्रजाती विषारी नसतात. ॲटार्टिका महाद्वीप सोडून सर्व महाद्वीपांवर विषारी साप आढळतात.

(Don't-be-afraid-of-snakes-focus-on-treatment)

टॅग्स :snake