अपस्माराचा झटका आल्यावर 'या' ५ गोष्टी ताबडतोब करा!

आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो
epilepsy help
epilepsy help
Updated on

आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस (International Epilepsy Day) दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस 14 फेब्रुवारीला साजरा होत आहे. हा दिवस इंटरनॅशनल ब्युरो फॉर एपिलेप्सी (IBE) आणि इंटरनॅशनल लीग अगेन्स्ट एपिलेप्सी (ILAE) द्वारे 2015 मध्ये सुरू करण्यात आला होता.

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, अंदाजे 10 पैकी 1 लोकांना अपस्माराचा झटका होऊ शकतो. हा झटका कधीही येऊ शकतो. म्हणूनच तुम्हाला अशावेळी मदतीची (Medical Help) गरज लागू शकते. जर एखाद्याला अपस्माराचा झटका आला असेल तर त्याची प्रकृती (Health) अधिक गंभीर होण्यापासून वाचण्यासाठी काय करावे हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील ५ गोष्टी करा.

epilepsy help
शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट
phone
phoneesakal

या ५ गोष्टी करा

आत्पकालीन क्रमांकावर फोन करा - तुमची तब्येत बिघडल्यावर तुम्ही लगेचच वैद्यकीय मदत घेतली पाहिजेत. जर याआधी तुम्हाला कधी स्ट्रोक आला नसेल, चक्कर आल्यानंतर श्वास घेण्यास किंवा उठायला अडचण येऊ शकते. तुमचा त्रास पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहतो. पहिल्या झटक्यानंतर लगेचच त्या व्यक्तीला दुसरा झटका येतो. काही वेळा दुखापत होते. एखाद्या व्यक्तीला मधुमेह, हृदयविकार यासारखे आजार असतील तर जास्त सांभाळावे लागते.

epilepsy help
स्तनाच्या कर्करोगाचे रक्त तपासणीमुळे होणार लवकर निदान
help
helphelp

त्रास होणाऱ्या व्यक्तीसोबत राहा- वैद्यकीय मदत मिळेपर्यंत अपस्माराचा त्रास होणाऱ्या व्यक्तीसोबत राहा. ती व्यक्ती पूर्ण शुद्धीवर येत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीजवळ थांबा. त्रास संपल्यावर व्यक्ती पुन्हा शुद्धीवर आली की तिला सुरक्षित ठिकाणी बसण्यास मदत करा. व्यक्ती सावध झाली. चांगला संवाद साधायला लागली की त्यांना काय झाले त्याविषयी सांगा.

epilepsy help
३ सेकंद व्यायाम केल्याने वाढते स्नायूंची ताकद, अभ्यासात स्पष्ट

त्या व्यक्तीसोबत आरामात बोला - एखाद्याला अपस्माराचा झटका आल्यावर आजुबाजुचे लोकं घाबरून जातात, असे अनेकदा दिसून येते. जर एखाद्याच्या बाबतीत असे झाले असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला शांतपणे वागले पाहिजे. रूग्ण शुद्धीवर येईपर्यंत त्याला विश्रांती घेऊ द्या. शुद्धीवर आल्यावर त्याच्याशी आरामात बोला. तुम्ही अस्वस्थ झालात तर ती व्यक्ती अस्वस्थ होऊ शकते.

epilepsy help
व्यायामामुळे सुधारते लैंगिक आरोग्य, अभ्यासात स्पष्ट

मेडिकल ब्रेसलेट असल्याची खात्री करा- ज्या लोकांना अपस्माराचा झटका येतो ते सहसा मेडिकल ब्रेसलेट वापरतात. त्यामुळे ते तातडीने वैद्यकीय मदत घेऊ शकतात. अशा वेळी त्या व्यक्तीने वैद्यकीय ब्रेसलेट किंवा इतर आपत्कालीन उपकरणे घातली आहेत का ते तपासावे.

epilepsy help
कोरोना बरा करणारा नेझल स्प्रे लाँच ! कसा करेल काम जाणून घ्या
care
care

स्वतःला आणि इतर लोकांना शांत ठेवा- अपस्माराचा झटका आल्यावर आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे अशा परिस्थितीत सर्वप्रथम तुम्ही स्वतःला आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना शांत राहण्यास सांगायची गरज आहे. वैद्यकीय मदत येईपर्यंत त्याच्यासोबत रहा किंवा टॅक्सी किंवा इतर कोणाला कॉल करण्याचा प्रयत्न करा.

epilepsy help
Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com