ऑलिंपिक खेळाडू आणि आपण सारे!

खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे आपल्याला कौतुक वाटत असते. आपल्यालाही ती लाभावी ही अनेकांची इच्छा असते. शारीरिक व मानसिक क्षमता वाढविण्यासाठी खेळाडू आपल्यापेक्षा काय वेगळे करतात, हे समजून घेतले पाहिजे.
olympic
olympicsakal

जपानमध्ये सध्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू असून, त्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. ही चार वर्षांतून एकदा होणारी स्पर्धा प्रत्येक देशातले खेळाडू व त्या देशांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपण ऑलिम्पिकमधील वेगवेगळ्या खेळांमध्ये व्यावसायिक खेळाडूंना खेळताना पाहतो, त्या वेळी आपल्या सर्वांनाच त्यांचा शारीरिक शक्ती व मानसिक आरोग्याचे कौतुक वाटते. प्रत्येक ऑलिम्पिक बघणाऱ्या माणसाला असे वाटते, की आपले शरीर एका ‘ऑलिम्पिक ॲथिलिट’सारखे असावे. आपण रोज व्यायाम करतो, योग्य आहार घेतो, तरीही खेळाडूंच्या शारीरिक शक्तीपर्यंत पोहचू शकत नाही. शारीरिक, मानसिक क्षमता वाढविण्यासाठी खेळाडू आपल्यापेक्षा काय वेगळे करतात, हे समजून घेऊ.

व्यायामाचा हेतू : खेळाडूंच्या व्यायाम करण्याच्या पद्धतीत व हेतूमध्ये महत्त्वाचा फरक असतो. सामान्यतः आपला हेतू व्यायाम करताना शारीरिक आरोग्य चांगले ठेवणे, वजन कमी करणे, व्याधींपासून दूर राहणे हा असतो. मात्र, खेळाडूचा व्यायाम व सरावाचा हेतू त्याच्या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी व कार्यप्रदर्शन राखण्यासाठी असतो; केवळ शारीरिक आरोग्य चांगले ठेवणे नाही. प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ पहिल्यापेक्षा चांगला करायचा असतो.

व्यायामाचा प्रकार : आपण एखादा व्यायाम करताना तो एक ठराविक प्रकारचा असतो. उदा. पळणे, चालणे, वजन उचलणे किंवा जिमला जाणे. आणखी एक विशेष बाब म्हणजे, सहसा अंगवळणी पडलेला एखादा व्यायाम प्रकार आपण लवकर बदलत नाही. या उलट व्यावसायिक खेळाडू विविध व्यायाम मिश्र स्वरूपात, वेगवेगळ्या दिवशी अथवा वेगवेगळ्या वेळी करतात. यात विशिष्ट प्रकारच्या हालचालींमध्ये आपल्या स्नायूंमध्ये कार्यप्रदर्शन वाढविण्यासाठी वेगवेगळी रणनीती वापरण्याचा आणि वेगवेगळ्या व्यायामाचा समावेश असू शकतो. ते त्यांच्या खेळासाठी लागणाऱ्या प्रत्येक स्नायूच्या बळकटीकडे लक्ष देतात. कॉग्निटिव्ह ट्रेनिंग, म्हणजे मेंदूची क्षमता आणि चपळता वाढवण्याची ते विशेष मेहनत घेतात.

olympic
World Hepatitis Day 2021 : जगात ३० सेकंदात एकाचा मृत्यू

व्यायामाची साधने : बऱ्याचदा जागतिक दर्जाचे व्यावसायिक खेळाडू तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सर्व व्यायाम करत असतात. त्यासाठी उच्च दर्जाचे फिटनेस ट्रॅकर, खेळाच्या आवश्यकतेनुसार आणि खेळाडूच्या शरीर रचनेनुसार विशिष्ट तयार केलेले खेळाचे, व्यायामाचे बूट व इतर साहित्य, जागतिक दर्जाचे कोच अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात. त्याचा तुलनेत नेहमी व्यायाम करणाऱ्यांकडे हे सगळे असतेच, असे नाही.

olympic
व्हायरल हेपेटायटीस म्हणजे काय? जाणून घ्या कारणे, उपचार

आहार : हा अत्यंत महत्त्वाचा फरक आपल्याला सामान्य लोकांमध्ये व प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळेल. खेळाडू अत्यंत उच्च प्रथिने, कमी दर्जाचे व नैसर्गिक कार्ब असे आहार घेतात. त्यांचा आहाराचे प्रमाण व वेळा काटेकोरपणे पाळल्या जातात. व्यावसायिक खेळाडू त्यांच्या शरीरामधील खनिजे आणि जीवनसत्त्वांची पातळी सतत देखरेखीखाली ठेवतात व त्याचा आहारातून समतोल ठेवतात किंवा काही सप्लिमेंट्स घेतात. सामान्यांना हे शक्य होत नाही.

दिनचर्या : सर्वसामान्य माणसाच्या दिनचर्येत व्यायाम, आहार हा एक भाग असतो, पण खेळाडूंसाठी हीच दिनचर्या असते. हाच फरक त्यांना एक जागतिक दर्जाचा खेळाडू बनवते. त्यांची झोप, स्नायू पुनर्प्राप्ती, सराव या गोष्टी त्यांच्या दिनचर्येचा भाग असतात व त्यांचा दर्जा ठरवण्यात महत्त्वाच्या ठरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com