

सध्याच्या काळात अनेक स्त्रिया, मुली PCOS आणि PCOD या आजाराने त्रस्त आहेत. गर्भशयाला जोडून असलेल्या २ बीजग्रांथींवर पाण्याच्या गाठी तयार होतात. त्यामुळे स्त्री शरीरातील संप्रेरकांचे असंतुलन निर्माण होते आणि PCOS आणि PCOD चा त्रास जाणवू लागतो. व्यायामाचा अभाव ,बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव, चुकीचा आहार या सगळ्या गोष्टी PCOS आणि PCOD ला मूळ कारणीभूत आहेत. त्यामुळे PCOS आणि PCOD चा त्रास टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही नित्यनियम व डाएट दिला आहे तो पाहुयात. (pcos-diet-by-health-expert-ssj93)
आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
नाश्ता - PCOS / PCOD चा त्रास जाणवत असेल तर फास्ट फूड बंद करुन आहारात सकस व पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, भाजणीचे थालीपीठ, हिरव्या मुगाचं घावण, दलिया यांचा समावेश करावा.
जेवण -
मुगाच्या डाळीचं वरण, एखादी फळ भाजी (लालभोपळा, पडवळ, घोसाळे, दोडका, तोंडली, भेंडी, फरसबी, मुळा, शेंगा, कोबी, मेथी), पालेभाजी (चाकवत, पालक, घोळ, कांद्याची पात). पोळी किंवा ज्वारीची भाकरी, गाजर किंवा काकडीचं सॅलड.दुपारच्या जेवणातून भात वर्ज्य करुन टाका. परंतु, भात खायची इच्छा असेल तर तांदूळ भाजून घ्यावेत मग त्याचा भात करावा. चवस,कारळाची चटणी.
संध्याकाळचा स्नॅक्स
फळे -
फलाहारामध्ये बहुबीजीय फळ म्हणजेच पेरू, डाळींब, पपई, अंजीर, इ. संत्री , मोसांबी, आवळा, कवठ यांचा समावेश ऋतूनुसार करावा.
सुकामेवा -
लाल भोपळ्याच्या बिया, अक्रोड, काळा मनुका चारोळी , बदाम, खारीक, सुके अंजीर यापैकी एक दररोज खावे.
रात्रीचं जेवण -
रात्री ८ च्या आतमध्ये जेवण करावं. रात्री उशीरा जेवणे, जागरण करणे यामुळे PCOS चा त्रास वाढतो.
दरम्यान, नाश्ता, सकाळ, दुपारचं जेवण यांच्यामध्ये ठराविक अंतर असावं. तसंच अगदीच भूक लागली तर साळीच्या किंवा राजगिऱ्याच्या लाह्या खाव्यात. मैद्याचे पदार्थ, तेलकट पदार्थ, कोल्ड ड्रिंक, पॅकेट बंद पदार्थ , खारवलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत.
नित्यनियम -
रोज ३० ते ४५ मिनटे व्यायाम करावा. यामध्ये सूर्यानमस्कार, योगासने, चालणे, सायकलिंग हे प्रकार करावे. मानसिक ताण असल्यास प्राणायाम, योगसाधना याची मदत घ्यावी. रोज किमान ८ तास शांत झोप घ्यावी .जागरण न करता शक्यतो १०.३० झोपण्याची सवय करावी. आहारासोबत या सर्व गोष्टीचे पालन केलेतर PCOS पूर्णतः बरा होतो.
(डॉ. ज्योत्स्ना गोखले या पुण्यातील वेदिक्यूर हेल्थकेअर आणि वेलनेस येथे आयुर्वेद आरोग्य तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.