
फळे खाणे शरीरासाठी आरोग्यदायी असते. त्या-त्या ऋतूमध्ये आलेली फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते घटक त्या-त्या वेळी पुरेशा प्रमाणात प्राप्त होतात.
नवी दिल्ली : फळे खाणे शरीरासाठी आरोग्यदायी असते. त्या-त्या ऋतूमध्ये आलेली फळे खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते घटक त्या-त्या वेळी पुरेशा प्रमाणात प्राप्त होतात. फणस, अननस यांसारखी फळे लोकांची लोकप्रिय फळे नसली तरीही ही फळे खाणे सर्वांत फायदेशीर मानले जाते. आपल्या शरीरासाठी अननस खुपच फायदेशीर आहे. जर तुम्ही दररोज अननसाचे सेवन करत असाल तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. तर जाणून घेऊया अननसाचे काय आहेत फायदे.
हेही वाचा - 'ब्लॅक कॉफी' हृदयाच्या समस्येवर रामबाण उपाय?, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे
1. अननसामध्ये विटामिन सीचे प्रमाण तब्बल 78.9 टक्के असते. अननस खाल्ल्याने शरीराचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो. शरीरावर झालेले घाव भरुन काढण्यास तसेच आयरनच्या कमतरतेमुळे झालेल्या आजारांना दूर करण्यासाठी अननस फायदेशीर ठरतो.
2. अननस खाऊन वजन कमी केलं जाऊ शकतं. अननसमध्ये कॅलरीचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये विटामिन आणि खनिजे देखील असतात.
3. अननसमध्ये ब्रोमेलॅन असतं. यामुळे एन्झाइमचं मिश्रण असतं. याचा वापर खासकरुन मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये पचनशक्तीला मजबूत करण्यासाठी म्हणून केला जातो.
हेही वाचा - मद्य पिणाऱ्यांनो सावधान;मद्यात हे मिक्स करू नका, अन्यथा जावू शकतात तुमचे प्राण
4. अननसामध्ये मँगनीज असल्याने हाडांना मजबूत करण्यामध्ये त्याचा फायदा होतो. तसेच अननस ऑस्टियोपोरोसिसला स्थिर करण्यासाठी मदत करतो.
5. अननसामध्ये रोगाशी लढणाऱ्या एँटीऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. अभ्यासानुसार, कँन्सरशी लढण्यासाठी याचा मोठा फायदा होतो.
6. अननस खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढतो. थंडीच्या दिवसांमध्ये याचं सेवन केलं पाहिजे.