
औरंगाबाद ः पोटात गॅस होणे आणि त्याचा दुर्गंधी येण्याचे मूख्य कारण म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित न होणे. बहुतांश लोकांना ही समस्या असते. वेळीच या गोष्टीकडे लक्ष न दिल्यास पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्तीला याचा त्रास आहे,तो व्यवस्थित समजू शकतो. पोटातील गॅस रोखून ठेवला आणि चारचौघात याचा स्फोट झाला तर आणखी पंचाईत होते. काही ठराविक नियम पाळले तर पोटातील गॅसची समस्या दूर होवू शकते.
पोटात गॅस होणे ही समस्या अनेकांना असते. याचे मुख्य कारण म्हणजे अवेळी जेवण करणे, जेवताना चावून न खाणे, भूक लागलेली नसताना जेवणे, रात्री जागरण करणे तसेच जेवताना खूप पाणी पिणे तसेच मानसिक तणाव असल्यावरही पोटात गॅस होवू शकतो. अशा व्यक्तीला ऑफिसला, मिटींगला किंवा मित्रमंडळीत बसायंच म्हटलं कि टेंन्शन येतं. आत्मविश्वास सुद्धा कमी होतो. यावेळी अचानक पोटातील गॅसचा स्फोट झाला तर आपला आपमान होईल, म्हणून हे लोक बैठकीत बसण्यास टाळाटाळ करतात. दिवसांतून २५ पेक्षा जास्त किंवा वारंवार ढेकर शरीरातील वायु होण्याचे प्रमाण वाढवते.
रात्रीच्या वेळी ते अधिक वाढते. पोटातील गॅस, दुर्गंधी घालवण्यासाठी अनेक औषधोपचार आहे. मात्र, हे काही काळासाठी फायद्याचे असतात. म्हणून या समस्येचा नायनाट करण्यासाठी घरातील आयुर्वेदिक वस्तूंचा वापर करुन पोटाची समस्या दूर करता येवू शकते. शंखवटीच्या दररोज दोन गोळ्या घेणे, दोन ग्राम हिंगवाष्टक चूर्ण जेवणाच्या सुरवातीला तूप किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो. तसेच सकाळी उठून प्रातविधी झाल्यानंतर पवनमुक्तासन हे योगासन करणे. या आसनाने पोटात जमा झालेला गॅस मुक्तपणे बाहेर पडतो. हा योगप्रकार दररोज करणे.
रंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात
--
हे टाळा ः
- मोड आलेले कडधान्य कमी खावे किंवा काही दिवस बंद करावीत
- ब्रेड, विस्किट, समोसा कचोरी असे मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, शिळे, अंबवलेले पदार्थ खाण्याचे टाळा
- दिवसा झोप घेणे टाळा, रात्री जागरण करु नका
- अवेळी जेवण करु नका, घाईघाईत खावू नका
- सोडा, बीयर, मद्यपान, धुम्रपान करणे टाळा
--
हे करा...
- जेवणाच्या वेळा नियमित पाळा
- जेवताना घास चावून चावून खा
- सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या
- जेवणानंतर भाजलेला ओवा, बडीशेप खा
- दररोज पोटाचे व्यायाम किंवा योगा करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.