आवडतं गाणं ऐका! अल्झायमरचा त्रास होईल कमी, संशोधनाचा दावा

एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
listening to a favorite song
listening to a favorite song esakal
Summary

एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

आवडते गाणे (favorite song) ऐकल्याने अल्झायमरच्या (alzheimers) रुग्णांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. टोरंटो विद्यापीठ (University of Toronto) आणि युनिटी हेल्थ टोरंटोच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. हे संशोधन जर्नल ऑफ अल्झायमर डिसीजमध्ये प्रकाशित झाले आहे. त्याचा अल्झायमरच्या रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. (research has shown that listening to a favorite song improves alzheimers disease)

संशोधकांनी सांगितले की, अल्झायमरच्या रुग्णांमध्ये (In Alzheimer's patients) सकारात्मक मेंदूतील बदल दर्शविणे सहसा खूप कठीण असते. हा आतापर्यंतचा उत्साहवर्धक परिणाम आहे. गाणे ऐकल्यानंतर रुग्णांमध्ये सुधारणा होते. यामध्ये देखील रुग्णांना आवडते गाणे ऐकून आणखी सुधारणा दिसून आली. स्मृतिभ्रंश (Dementia) असलेल्या लोकांसाठी गाण्याचा चिकित्सक प्रयोगाची दारे उघडतो, असेही ते म्हणाले.

listening to a favorite song
‘अल्झायमर डे’; दर ३ सेकंदात एकाला स्मृतीभ्रंश

स्मृतिभ्रंश (Dementia) असलेल्या रुग्णांमध्ये, संगीत-आधारित हस्तक्षेपामुळे त्यांची क्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. यासोबतच, न्यूरोसायकोलॉजिकल (Neuropsychological) चाचण्यांमध्ये मेंदूच्या स्मृती कार्यक्षमतेत वाढ होऊन मेंदूच्या मज्जासंस्थेच्या मार्गांमध्येही बदल दिसून आले. भविष्यात याचे आणखी फायदे होतील, असे संशोधनाचे ज्येष्ठ लेखक आणि कॅनडातील संगीत आणि आरोग्य विज्ञान संशोधन सहयोगाचे संचालक डॉ. मायकल थॉट यांनी सांगितले. संशोधकांनी संगीतकारांमध्ये गाणी ऐकल्याने सूक्ष्म, परंतु विशिष्ट मेंदूतील बदल गैर-संगीतकारांच्या तुलनेत दिसून आले. या निष्कर्षांची पडताळणी करण्यासाठी पुढील अभ्यास आवश्यक आहेत. संगीताच्या वारंवार प्रदर्शनासह, सर्व सहभागींमध्ये सुधारणा दिसून आल्या.

listening to a favorite song
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर! 

न्यूरल कनेक्टिव्हिटीवर परिणाम (Effects on neural connectivity)

डॉ.थोट यांनी सांगितले की, आमच्याकडे मेंदूशी संबंधित नवीन पुरावे आहेत. तसेच संगीत तंत्रिका कनेक्टिव्हिटीला अशा प्रकारे उत्तेजित करते जे उच्च पातळीचे कार्य राखण्यात मदत करते. संशोधकांच्या टीमने अभ्यासातील सहभागींच्या तंत्रिका मार्गांमध्ये संरचनात्मक आणि कार्यात्मक बदल नोंदवले आहेत. विशेषत: प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये (The control center of the brain), जिथे खोल संज्ञानात्मक प्रक्रिया (Open cognitive process) घडतात. डॉ.थोट हे संशोधनाचे ज्येष्ठ लेखक आणि कॅनडातील संगीत आणि आरोग्य विज्ञान संशोधन सहयोगाचे संचालक आहेत.

(research has shown that listening to a favorite song improves alzheimers disease)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com