esakal | इनर इंजिनिअरिंग : भारतीय देवदेवता आणि शस्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : भारतीय देवदेवता आणि शस्त्र

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

प्रश्न - भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी शांती आणि आनंदाबद्दल बोलतो, मग देवदेवता हे एवढ्या शस्त्रास्त्रांबरोबर का दाखवले जातात? ते इतके हिंसक का दाखवले आहेत?

सद्‍गुरू - कारण त्यांना शस्त्रास्त्रांचे महत्त्व समजले होते! ह्या देशात आमच्याकडे माजी राष्ट्रपती होते, जे रॉकेट व क्षेपणास्त्र वैज्ञानिक होते. शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये खूप शांतीप्रिय लोक सहभागी होते, कारण त्यांना हे समजले होते की आपल्याकडे आवश्यक शस्त्रे असतील तरच आपण देशामध्ये शांती राखू शकता. अन्यथा, कोणीही आणि केव्हाही तुमच्यावर हल्ला करू शकतो. इतर धर्मांमध्ये त्यांचे देवदेवता नि:शस्त्र असतात, पण लोक मात्र सशस्त्र असतात. आपण अजून अशा जगात राहत नाही, जिथे मानवी जागरूकता इतकी विकसित झाली आहे, की शस्त्रास्त्रांची मुळीच गरज नाही आणि स्व-संरक्षणाची चिंता करण्याची गरज नाही.

या ग्रहावरील सर्वांत यशस्वी राष्ट्रे सामान्यत: शस्त्रास्त्रे निर्माण करूनच टिकून राहिले आहेत. तर, आमच्या देवांनाही याची जाणीव होती. कारण लोक नेहमी देवाकडे संरक्षण आणि कल्याणाची मागणी करत असतात म्हणून, एक निःशस्त्र देव निरुपयोगी देव पाहिला गेला, म्हणून त्यांनी त्याला सशस्त्र केले. मात्र, त्यांच्याकडे प्रेम आणि शांतीचे सुद्धा इतर संकेत आहेत. हे तर शांतता आणि बंदूक एकाच वेळी धारण करण्यासारखे आहे. मुख्यतः देवदेवतांचे वर्णन आपल्याला हे समजावून देण्यासाठी आहे, की आपण देव म्हणून जे सूचित करता ते जीवनातील सर्वोच्च पैलू आहेत. जीवन शांतीही नाही किंवा हिंसाही नाही. हे बऱ्या‍च गोष्टींचे एक जटिल मिश्रण आहे आणि शांती व हिंसा या दोन्ही गोष्टी याचा भाग आहेत.

लोक बऱ्याचदा घरी त्यांच्या बागेत आराम करतात. त्यांना वाटते, की बाग इतकी शांत जागा आहे. मात्र, तुम्ही जमिनीच्या खाली खोदल्यास मुळे, कृमी-कीटक, माती आणि विविध प्राणी यांच्यात जिवंत राहण्यासाठी सतत संघर्ष चालू असतो.

क्षणाक्षणाला, त्यांच्यातील लाखो जीव मारले जात आहेत आणि लाखो जन्म घेत आहेत. हिंसारहित शांती ही तुमची कल्पनाही अगदी अपरिपक्व शांती आहे. इथे आपल्या संस्कृतीत आम्ही शांती काही बाहेर घडणारी गोष्ट समजली नाही. शांती ही तुमच्या आत घडणारी गोष्ट म्हणून पाहिली. म्हणूनच इतके सखोल आंतरिक शोध आणि ठाव घेतले गेले. लोक नेहमीच असा विचार करतात, की जंगल हे एक शांत ठिकाण आहे. मला वाटते, की ही एक अगदी अपरिपक्व कल्पना आहे. वन हे खूप हिंसक ठिकाण आहे. आपल्या लक्षात आले आहे का, जेव्हा एखादी गोष्ट हिंसक होते तेव्हा आपण म्हणतो हे जंगली आहे. प्रत्येक क्षणी कुणीतरी कुणाला तरी मारण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला असे वाटते जंगल शांत आहे, तर तुमची दृष्टी फारच वरवरची आहे. जीवनात तुम्ही थोडेसे खोलवर पाहिल्यास तुम्हाला कळेल, की शांती किंवा हिंसा असे काहीही नाही.

जीवन प्रक्रियेमध्ये निर्मिती आणि विनाश दोन्ही समाविष्ट आहेत. ते चालूच आहे. जीवनात सर्व पैलूंचा समावेश आहे. म्हणून देवदेवतांना सर्व पैलूंनी चित्रित केले गेले. तुम्ही दहा हातांचे निरीक्षण केले, तर सर्व दहा हात शस्त्रे धारण केलेले नाहीत. हे केवळ हिंसा किंवा शांती नव्हे. तर जीवनाच्या सर्व पैलूंच्या शिखराचे प्रतीक आहे.

loading image