esakal | इनर इंजिनिअरिंग : शंकराला बेलपत्र का आवडते ?
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

एक पान दुसऱ्यापेक्षा जास्त पवित्र का आहे? हा एक प्रकारचा पूर्वाग्रह आहे का? शेवटी, सर्व काही त्याच मातीतून येते. कडूलिंब आणि आंबा ही दोन्ही फळे एकाच मातीतून येतात; पण त्यांची चव फारच वेगळी असते, नाही का? एखादे विशिष्ट जीवन त्याच मातीवर कशी प्रक्रिया करते आणि त्याच मातीवर दुसरे जीवन कसे प्रक्रिया करते ते वेगळे आहे.

इनर इंजिनिअरिंग : शंकराला बेलपत्र का आवडते ?

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

एक पान दुसऱ्यापेक्षा जास्त पवित्र का आहे? हा एक प्रकारचा पूर्वाग्रह आहे का? शेवटी, सर्व काही त्याच मातीतून येते. कडूलिंब आणि आंबा ही दोन्ही फळे एकाच मातीतून येतात; पण त्यांची चव फारच वेगळी असते, नाही का? एखादे विशिष्ट जीवन त्याच मातीवर कशी प्रक्रिया करते आणि त्याच मातीवर दुसरे जीवन कसे प्रक्रिया करते ते वेगळे आहे. एक अळी आणि एक कीटक, आणि तुम्ही आणि दुसरी एक व्यक्ती यात काय फरक आहे? हे सर्व एक समान साहित्य आहे, तरीही आपण त्यातून जे तयार करतो ते वेगळे आहे.

लोक आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करतात, तेव्हा ते सतत शक्य त्या प्रत्येक मार्गाने सहाय्याच्या शोधात असतात, कारण हा एक अज्ञात प्रदेश आहे.  तुम्ही एव्हरेस्ट चढत असाल आणि तुम्ही एक छोटा धागा घेऊन गेलात, तर तुम्हाला तो धागा गमवायचा नसतो. तुम्हाला तो जपून ठेवायचा असतो कारण हा छोटा धागा केव्हा उपयोगी ठरेल हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही एखाद्या शहरात असताना तुम्ही तो टाकून जाऊ शकता, परंतु तुम्ही अशा प्रकारच्या भूप्रदेशावर आहात जो तुम्हाला अपरिचित आहे, म्हणून तुम्ही काहीही टाकून देऊ इच्छित नाही. कारण उद्या हे कसे उपयोगी पडेल हे तुम्हाला ठाऊक नाही. अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करताना सुद्धा हे लागू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय संस्कृतीत, तुम्हाला आधार देणारी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट अतिशय बारकाईने निरीक्षण आणि ध्यान करून ओळखली गेली आहे. त्यांनी फुले, फळे आणि पानेदेखील सोडली नाहीत. विशेषतः बेलपत्र पवित्र का मानले गेले आहे? बेल शिवशंकराला फार प्रिय आहे. त्याला याची काय पर्वा आहे? हे काही शिवाला प्रिय आहे असे नाही. आपण म्हणतो की ते शिवाला प्रिय आहे, तेव्हा आपल्याला असे म्हणायचे असते, की काही ना काही मार्गाने त्याचे स्पंदन आपण ज्याला शिव म्हणतो त्याच्याशी फार साधर्म्य आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण यासारख्या बऱ्‍याच गोष्टी ओळखल्या आणि केवळ त्याच गोष्टी अर्पण केल्या जातात, कारण त्या गोष्टी तुमचे साधन बनतात शिव तत्त्वाच्या संपर्कात येण्यासाठी. तुम्ही शिवला बेलपत्र अर्पण करता, तेव्हा तुम्ही ते पान तिथेच त्याच्याबरोबर सोडत नाही. हे अर्पण केल्यानंतर तुम्ही ते तुमच्याबरोबर घेऊन जाणे अपेक्षित असतेस कारण या विशिष्ट पानात ती स्पंदने शोषण्याची सर्वाधिक क्षमता आहे. तुम्ही ते शिवलिंगावर ठेवले आणि ते परत घेतले, त्यामध्ये स्पंदने दीर्घकाळ टिकून ठेवण्याची क्षमता आहे. हे तुमच्याबरोबरच राहते. तुम्ही हे करून बघू शकता: बेलाची पाने अर्पण करा, तुमच्या छातीजवळच्या खिशात ठेवा आणि फिरा, हे तुमचे आरोग्य, कल्याण, मानसिक स्थितीत – अशा सर्व  बाबतीत प्रभाव टाकेल.
अशा प्रकारची अनेक साहित्य-सामग्री साधने म्हणून ओळखली गेली आहेत, जी लोक वापरतात. हे काही देवांबद्दल नाही, हे केवळ तुमच्याबद्दल आहे आणि एखाद्या शक्तीचा ठाव घेण्याबद्दल आहे.

Edited By - Prashant Patil